कर्जत : घराचा उतारा काढून देण्याच्या कारणावरून कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील ग्रामसेवक महादेव माने यांना मारहाण करण्यात आली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संजय मद्रास काळे (रा. निमगाव डाकू, ता. कर्जत) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी (दि.१५) सकाळी अकराच्या सुमारास निमगाव डाकू येथील ग्रामपंचायत कार्यालयात महादेव माने हे कार्यालयीन काम करत होते. संजय मद्रास काळे (रा. निमगाव डाकू, ता. कर्जत) हा कार्यालयात आला. आईच्या नावावरील आमच्या घराचा मला उतारा काढून द्या, असे तो म्हणाला. त्यावेळी माने हे ८ ‘अ’चे रजिस्टरला नाव पाहून तुमचा उतारा काढून देतो, असे म्हणाले. त्यावर काळे याने शिवीगाळ, दमदाटी करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्याने रजिस्टर फेकून देऊन कार्यालयातील खुर्च्यांची मोडतोड केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. संजय काळेला कर्जत पोलिसांनी अटक केली.
निमगाव डाकू येथील ग्रामसेवकास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST
कर्जत : घराचा उतारा काढून देण्याच्या कारणावरून कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील ग्रामसेवक महादेव माने यांना मारहाण करण्यात आली. ...
निमगाव डाकू येथील ग्रामसेवकास मारहाण
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}