शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा पावले

By admin | Updated: September 7, 2016 00:37 IST

अहमदनगर : जिल्ह्यात यंदा पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असून, या उत्सवामुळे बाजारपेठेला नवसंजीवनी मिळाली आहे़

अहमदनगर : जिल्ह्यात यंदा पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत असून, या उत्सवामुळे बाजारपेठेला नवसंजीवनी मिळाली आहे़ गेल्या सात ते आठ दिवसांपासून बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे़ गणेश मूर्ती, सजावटीसह विविध साहित्य विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून मंदावलेल्या बाजारपेठेला यंदा गणपती बाप्पा चांगलेच पावले असल्याचे म्हणता येईल़ शहरात गेल्या दोन दिवसांत गणेश मूर्ती विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली़ महाराष्ट्रासह परराज्यातूनही यंदा येथील मूर्तींना मोठी मागणी होती़ शहरातील मूर्ती कारखान्यात गेल्या सहा महिन्यांपासून दीड हजार मजुरांच्या हाताला काम मिळाले़ सजावटीसाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक व इतर साहित्यांचीही मोठी विक्री झाली़ गणपती पूजेसाठी लागणारे छोटे-मोठे साहित्य विक्रीसाठी जिल्हाभरातून विक्रेते नगर शहरात आले होते़ केळी, डाळिंब, मोसंबी, सिताफळ, नारळ, केळी या फळांना मोठी मागणी वाढली आहे़ उत्सवानिमित्त विविध मंडळांकडून टी शर्टस्, जॉकेट व बनियानवर प्रिटिंग करून घेतले जात असून, कापडबाजारासह कारागिरांनाही चांगली संधी उपलब्ध झाली आहे़ दुष्काळामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून थंड पडलेल्या बाजारपेठेला चांगलीच उर्जितावस्था आली आहे़ गणेशोत्सव शांततेत साजरा होण्यासाठी पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, विविध ठिकाणी सर्वधर्मीय एकत्र येऊन उत्सव साजरा करत आहेत़ पोलिसांनी केलेल्या आवाहनाला अनेक गावांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकत्रित गणपतीची प्रतिष्ठापना केली़ नगर शहरात ८ खासगीसह ४५८ सार्वजनिक मंडळांनी परवानगी घेत प्रतिष्ठापना केली आहे़ विविध परिसरात बालमंडळांनीही प्रतिष्ठापना केल्या आहेत़ (प्रतिनिधी)यंदा डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातही जवळपास सर्वच मंडळांनी पारंपरिक वाद्यांना पसंती दिली आहे़ यामुळे काळाच्या पडद्याआड जावू पाहणारे सनई, डफ, लेझीम,झांज या वाद्यांचा पुन्हा एकदा गजर सुरू झाला आहे़ ४शहरात विविध मंडळांच्यावतीने गणेशोत्सवात विविध आकर्षक व प्रबोधनात्मक देखावे सादर केले जातात़ यंदाही पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या देखाव्यासह विविध भव्य देखाव्यांचे काम अंतिम टप्यात असून, नगरकरांना हे देखावे खुले होण्याची प्रतीक्षा आहे़ शहरासह जिल्हाभरातील नागरिक हे देखावे पाहण्यासाठी येतात़