होळी, रंगपंचमीच्या कार्यक्रमांवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:21 IST2021-03-26T04:21:11+5:302021-03-26T04:21:11+5:30

जिल्हाधिकारी भोसले यांनी गुरुवारी याबाबतचा आदेश दिला आहे. जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी एकत्रित येऊन ...

Ban on Holi, Rangpanchami events | होळी, रंगपंचमीच्या कार्यक्रमांवर बंदी

होळी, रंगपंचमीच्या कार्यक्रमांवर बंदी

जिल्हाधिकारी भोसले यांनी गुरुवारी याबाबतचा आदेश दिला आहे. जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसोर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे २८ मार्च ते २ एप्रिल, २०२१ या कालावधीत कोणत्याही सार्वजनिक स्वरुपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनास प्रतिबंध करण्यात आला आहे. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण टाळावी. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. या मार्गदर्शक सूचनांपेक्षा कडक निर्बंध स्थानिक प्रशासनाने लागू केले असतील तर त्याची अंमलबजावणी होईल.

-------

तर कडक निर्बंध लावणार

होळी, रंगपंचमीनिमित्त राज्य शासनाने मार्गदर्शक सूचनांचे परिपत्रक काढले असले तरी आणखी कडक निर्बंध लागू शकतील, असा इशाराही या आदेशात दिला आहे. स्थानिक पातळीवर संबंधित शासकीय विभाग व यंत्रणांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Ban on Holi, Rangpanchami events