संगमनेर महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालयास पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:21 IST2021-07-30T04:21:55+5:302021-07-30T04:21:55+5:30

अनेक समाजोपयोगी कामे केल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयास पुरस्कारासाठी पात्र ठरले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेची कामगिरी कौतुकास्पद असून ...

Award for Outstanding College to Sangamner College | संगमनेर महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालयास पुरस्कार

संगमनेर महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालयास पुरस्कार

अनेक समाजोपयोगी कामे केल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयास पुरस्कारासाठी पात्र ठरले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेची कामगिरी कौतुकास्पद असून रासेयोचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रताप फलफले, प्रा. ललिता मालुसरे व प्रा. संदीप देशमुख यांनी केलेल्या कामांची ती पावती असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाकडून संगमनेर महाविद्यालयास जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय, डॉ. सचिन कदम यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार तर स्वयंसेवक प्रवीण काकड यांनी प्रशंसा प्रमाणपत्र प्राप्त केले. या यशाबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, अध्यक्ष प्रकाश क्षत्रिय, सचिव डॉ. अनिल राठी, जनरल सेक्रेटरी, नारायण कलंत्री, खजिनदार राजकुमार गांधी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा, डॉ. रवींद्र ताशिलदार यांनी कौतुक केले.

Web Title: Award for Outstanding College to Sangamner College