टाकळी ढोकेश्वरमध्ये एटीएम ओढून नेण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:24 IST2021-08-27T04:24:28+5:302021-08-27T04:24:28+5:30
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर रस्त्यालगत असणारे स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा ...

टाकळी ढोकेश्वरमध्ये एटीएम ओढून नेण्याचा प्रयत्न
टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर रस्त्यालगत असणारे स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र त्यात ते अयशस्वी ठरले. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे स्टेट बँकेचे दोन एटीएम शेजारीशेजारी आहेत. दि. २५ रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास यातील एक एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. दोन्ही एटीएमवर तीन सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. चोरट्यांनी प्रथम बाहेरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा रंगाचा स्प्रे मारला. नंतर पिकअप वाहनाला वायररोप लावून एटीएम मशीन उखडवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र हे मशीन अर्ध्या भागातूनच तुटल्याने चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. चोरट्यांचा चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याबाबत नगर ग्रामीणच्या उपअधीक्षक प्रांजली सोनावणे, पारनेरचे पोलीस निरीक्षक घनशाम बळप, उपनिरीक्षक हनुमान उगले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत एटीएम कंपनीच्या ॲापरेटर यांनी एटीएमची पाहणी केली असता सर्व रक्कम सुरक्षित असल्याचे सांगितले. या दोन्ही एटीएम मशीनमध्ये प्रत्येकी दहा याप्रमाणे वीस लाख रुपयांची रक्कम टाकण्यात आली होती. याप्रसंगी ठसेतज्ज्ञांनीही घटनास्थळाची पाहणी केली.