शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम चोर निघाला बनावट नोटांच्या रॅकेटचा मास्टरमाईंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:26 IST

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे २६ ऑगस्ट रोजी रात्री दोनच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया ...

टाकळी ढोकेश्वर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे २६ ऑगस्ट रोजी रात्री दोनच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम मशीन चोरण्याचा प्रयत्न करणारा आरोपीच बनावट चलनी नोटांच्या रॅकेटचा मास्टरमाईंड असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून बनावट नोटा छापण्याची सामग्री जप्त करण्यात आली आहे.

एटीएम चोरीबाबत पारनेर पोलिसांनी २४ तासात तीन चोरट्यांना अटक केली होती; मात्र यातील एक आरोपी फरार होता. पोलीस गेल्या काही दिवसांपासून आरोपीच्या मागावर होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने तपास केला असता पोलिसांनी या टोळीचा छडा लावला. वडगाव सावताळ येथील आरोपी सुरेश रोकडे (वय १९) याच्यासह दोन आरोपींना अटक केली. तपास करत असताना आरोपी सुरेश रोकडे हा बनावट नोटा छापत असल्याची माहिती पोलिसांना मिळत गेली. परंतु तो कोठे नोटा छापतो, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नव्हती. गुन्ह्याचा तपास करत असताना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत उगले यांनी आरोपीच्या वडगाव सावताळ येथील घराची झडती घेतली. त्याच्या घरात पाचशे व शंभर रुपयांच्या बनावट चलनी नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे रंग, कागदाची सामुग्री मिळून आली. पोलिसांनी ही सामग्री जप्त केली असून आरोपीच्या विरोधात पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.