शेवगाव तालुक्यातील रस्त्यांबाबत पालकमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:27 IST2021-08-18T04:27:08+5:302021-08-18T04:27:08+5:30

शेवगाव : तालुक्यातील विविध रस्त्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाथर्डी येथे नुकत्याच ...

Ask the Guardian Minister about the roads in Shevgaon taluka | शेवगाव तालुक्यातील रस्त्यांबाबत पालकमंत्र्यांना साकडे

शेवगाव तालुक्यातील रस्त्यांबाबत पालकमंत्र्यांना साकडे

शेवगाव : तालुक्यातील विविध रस्त्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पाथर्डी येथे नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीदरम्यान निवेदन दिले.

शेवगाव तालुक्यातील ग्रामीण रस्ते हेच दळणवळणाचे मुख्य साधन आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे होणे गरजेचे आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील सालवडगाव ते मुर्श्तपूर, वाडगाव, थाटे, शिंगोरी, राणेगाव, गोळेगाव, शेकटे खु., बाळूबाई तांडा, चिकणी तांडा रस्ता तसेच भातकुडगाव ते जोहरापूर, वडुले, भगूर, वरूर रस्ता आणि ढोरजळगाव ते गरडवाडी, आव्हाने बु., आव्हाने खु., भगूर आदी मुख्य रस्ते व्हावेत. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून खडीकरण पूर्णपणे उखडले आहे. पावसामुळे रस्ते चिखलमय झालेले आहेत. काही ठिकाणी रस्त्याने नागरिकांना पायी चालणेही अवघड झालेले आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Ask the Guardian Minister about the roads in Shevgaon taluka