शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
2
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
3
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
4
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
5
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
6
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
7
Video - हृदयस्पर्शी! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नवजात बाळांना कुशीत घेऊन पळाली नर्स
8
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
9
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
10
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
11
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
12
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
13
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
14
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
15
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
16
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
17
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
18
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
19
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
20
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी तनपुरेच हवेत-अरुण तनपुरे; राहुरीत विजय तमनर राष्ट्रवादीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 14:21 IST

राहुरी तालुक्याच्या विकास खुंटला आहे. पाण्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. आमदारांना राहुरी तालुक्याचे देणेघेणे नाही. त्यामुळे तालुक्याचे प्रश्न सुटण्यासाठी प्राजक्त तनपुरे यांना साथ द्या, असे आवाहन  राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे यांनी केले. 

राहुरी : तालुक्याच्या विकास खुंटला आहे. पाण्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. आमदारांना राहुरी तालुक्याचे देणेघेणे नाही. त्यामुळे तालुक्याचे प्रश्न सुटण्यासाठी प्राजक्त तनपुरे यांना साथ द्या, असे आवाहन  राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे यांनी केले. राहुरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत यशवंत सेना काम करणार आहे. यशवंत सेनेचे जिल्हा अध्यक्ष विजय तमनर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी तनपुरे बोलत होते.  राहुरी येथील बिरोबानगर परिसरात गंगाधर तमनर यांच्या अध्यक्षतेखाली सेनेचा मेळावा संपन्न झाला़. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस पांडुरंग निरगळ यांनी खासदार शरद पवार यांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतल्याने  प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत काम करणार असल्याचे सांगितले. भाजपला सत्तेतून खाली खेचले जाईल, असा इशारा पांडुरंग निरगळ यांनी दिला़ यावेळी गंगाधर बाचकर, विजय तमनर, यशवंत प्रहार संघटनेचे अध्यक्ष डॉ़ शशिकांत तरंगे यांनी भाषणे केली. कार्यक्रमास दत्ताभाऊ खेडेकर, दादासाहेब तमनर, आप्पासाहेब सरोदे, शहाजी विटनोर, संतोष नजन, भारत मतकर, अनिल माने, डॉ़स्वप्नील माने, भागवत झडे, राजू वाघ, आण्णासाहेब बाचकर, श्रीकांत बाचकर  उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल डोलनर यांनी केले़.  आभार ज्ञानेश्वर बाचकर यांनी मानले़. विकासासाठी सोबत-प्राजक्त तनपुरेवंचित बहुजन आघाडीचे तिकीट विजय तमनर यांना मिळाले होते़.  मात्र जनतेच्या हितासाठी त्यांनी माझ्यासोबत राहण्याचा मनाचा मोठेपणा दाखविला आहे़.  तरूणांची वैचारिक पातळी वाढलेली आहे़.  न्याय हक्काचा पाठपुरावा केला जाईल़.  धूळखात पडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी उमेदवारी करीत आहे़.  चांगले काम करून राहुरीला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देईल़, असे प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019