ज्ञानेश्वर कारखाना कामगार पतसंस्थेची वार्षिक साधारण सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST2021-03-26T04:20:46+5:302021-03-26T04:20:46+5:30

भेंडा : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना कामगार पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल शेवाळे ...

Annual General Meeting of Dnyaneshwar Factory Workers Credit Union | ज्ञानेश्वर कारखाना कामगार पतसंस्थेची वार्षिक साधारण सभा

ज्ञानेश्वर कारखाना कामगार पतसंस्थेची वार्षिक साधारण सभा

भेंडा : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना कामगार पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल शेवाळे व कारखान्याचे संचालक काकासाहेब शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत मंगळवारी ऑनलाइन पद्धतीने पार पडली.

संस्थेचे तज्ज्ञ संचालक काकासाहेब शिंदे यांची ज्ञानेश्वर कारखाना संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

सभेत सभासदांना वाटप करण्यात आलेल्या १५ टक्के लाभांश व १०.५ टक्के ठेवींवरील व्याज वाटपाचा कार्योत्तर मंजुरी देण्यात आली.

यावेळी झालेल्या चर्चेत विजय गव्हाणे यांनी पगारामधून कपात झालेल्या पतसंस्था कर्ज हप्त्याची रक्कम त्वरित संस्थेकडे जमा करण्याची मागणी केली. सभासद कर्ज मर्यादा वाढविण्यात यावी. संस्था व्यवहाराची माहिती संदेशाद्वारे देण्यात यावी. मयत सभासदाचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशा सूचना सभासदांनी मांडल्या. सुखदेव फुलारी, रामनाथ गरड, अंकुश दाभाडे, हरिभाऊ नजन, रवींद्र फटांगडे, श्रीनिवास भारदे, विलास परदेशी, अमृत काळे आदींनी चर्चेत भाग घेतला. सभासदांच्या प्रश्नांना अध्यक्ष अनिल शेवाळे व उपाध्यक्ष काकासाहेब लबडे यांनी उत्तरे दिली. यावेळी

कारखान्याचे सचिव रवींद्र मोटे, मानद सचिव कारभारी गायके, सहसचिव सुरेश उगले उपस्थित होते. कारभारी गरड यांनी आभार मानले.

Web Title: Annual General Meeting of Dnyaneshwar Factory Workers Credit Union