अन् स्मशानभूमीचे झाले नंदनवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:26 IST2021-08-25T04:26:58+5:302021-08-25T04:26:58+5:30

शंकर रामभाऊ कन्हेरकर या युवकाने. कोणाचा वाढदिवस असेल किंवा वास्तुशांतीचे निमंत्रण वा कोणाचा सत्कार समारंभ त्याठिकाणी हा युवक वृक्ष ...

And the cemetery became a paradise | अन् स्मशानभूमीचे झाले नंदनवन

अन् स्मशानभूमीचे झाले नंदनवन

शंकर रामभाऊ कन्हेरकर या युवकाने.

कोणाचा वाढदिवस असेल किंवा वास्तुशांतीचे निमंत्रण वा कोणाचा सत्कार समारंभ त्याठिकाणी हा युवक वृक्ष भेट देऊन त्यांचा सत्कार करतो. हे समाजकार्य गेल्या वर्षापासून सुरू आहे. आपण दिलेले वृक्ष लावले की नाही व त्या वृक्षाची वाढ झाली की नाही, याची संबंधितांकडे ते चौकशीही करतात. माजी सरपंच बाबासाहेब घुले यांच्या प्रेरणेतून हे कार्य सुरू केले, असे कन्हेरकर सांगतात. त्यांनी गावातील विकास कामांना महत्त्व देत स्मशानभूमी सुशोभिकरणास प्राधान्य दिले. लावण्यात आलेल्या वृक्षांना पाण्याची व्यवस्था पोलीस पाटील विकास भागवत, सरपंच जालिंदर तुपे, उपसरपंच दत्तात्रय भारस्कर यांनी केली. भेटवस्तू तेथे वृक्षभेट या उपक्रमातून पाच हजार वृक्ष लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे. नुकतेच त्यांनी गत वर्षी केलेल्या वृक्षांचा वाढदिवस माजी आमदार पांडुरंग अभंग व युवा नेते उदयन गडाख यांच्या हस्ते केला.

---------

फोटो : २४तरवडी वृक्षारोपण

तरवडी (ता. नेवासा) येथील स्मशानभूमीत समाजसेवक शंकरराव कन्हेरकर यांनी केलेल्या वृक्षारोपणामुळे येथे नंदनवन झाले आहे.

Web Title: And the cemetery became a paradise