विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनीही आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST2021-01-15T04:17:48+5:302021-01-15T04:17:48+5:30

पाथर्डी : सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. या युगात जो अपडेट असेल त्याचाच टिकाव लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनीही ...

Along with students, teachers should also be aware of modern technology | विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनीही आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे

विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनीही आधुनिक तंत्रज्ञान अवगत करावे

पाथर्डी : सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. या युगात जो अपडेट असेल त्याचाच टिकाव लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनीही आधुनिक तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक असल्याचे मत श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतीश गुगळे यांनी व्यक्त केले. श्री तिलोक जैन विद्यालयाने तयार केलेल्या वेबसाईटचे उद‌्घाटन गुगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त धरमचंद गुगळे, सदस्य घेवरचंद भंडारी, विश्वजीत गुगळे, प्राचार्य अशोक दौंड उपस्थित होते.

गुगळे म्हणाले, वेबसाईट तयार करणे म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी प्रचंड कष्ट, अचूक नियाेजन व सातत्य असावे लागते. प्राचार्य अशोक दौंड व त्यांच्या सहयोगी शिक्षकांनी प्रचंड मेहनत करून ही वेबसाईट तयार केली आहे.

प्रास्ताविकात प्राचार्य अशोक दौंड यांनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वेबसाईटला भेट द्यावी तसेच माजी विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन केले. सूत्रसंचालन सुनील कटारिया तर जब्बार खान पठाण यांनी आभार मानले.

Web Title: Along with students, teachers should also be aware of modern technology