एरंडोली येथील कृषिकन्येची बाजी

By Admin | Updated: June 18, 2014 01:23 IST2014-06-18T00:45:50+5:302014-06-18T01:23:39+5:30

श्रीगोंदा : एरंडोली सारख्या दुर्लक्षित खेड्यातील शेतकऱ्याची मुलगी! आई-वडिलांचे काबाडकष्ट व चुलत्यांची व्यवसायातील धडपड पाहून शिक्षणाची प्रेरणा मिळाली.

Agricultural research in Erandoli | एरंडोली येथील कृषिकन्येची बाजी

एरंडोली येथील कृषिकन्येची बाजी

श्रीगोंदा : एरंडोली सारख्या दुर्लक्षित खेड्यातील शेतकऱ्याची मुलगी! आई-वडिलांचे काबाडकष्ट व चुलत्यांची व्यवसायातील धडपड पाहून शिक्षणाची प्रेरणा मिळाली. परिस्थितीशी फायर फाईट करताना नियमित अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत केले. त्यामुळेच एसएससी परीक्षेत श्रीगोंदा तालुक्यात पहिला नंबर मिळविण्याचे स्वप्न साकार झाले, अशी माहिती अनुराधा सुदाम इथापे हिने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
एसएससी परीक्षेचा निकाल जाहीर होणार असल्याने अनुराधाच्या चेहऱ्यावर तणाव होता तसाच भविष्याचा वेध घेणारा आत्मविश्वास होता. अनुराधाचे चुलते हरिभाऊ याचा मोबाईल खणखणला आणि अनुराधा ९५.४० टक्के गुण मिळवून तालुक्यात पहिली आली. ही शुभ वार्ता समजताच इथापे परिवाराने जल्लोष केला. अनुराधाचे आई-वडील गावीच होते त्यांना ही माहिती देताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.
अनुराधा इथापे लहानपणापासून शालेय अभ्यासात हुशार, गावी शिक्षणाची सोय नसल्याने श्रीगोंद्यात टेलर काम करणारे चुलते हरिभाऊ, काकी शोभा यांनी अनुराधाला आधार दिला. अनुराधाने पहिलीपासून दहावीपर्यंत नियमित अभ्यास चालू ठेवला. शिक्षकांचा एक गुणी मुलगी म्हणून विश्वास संपादन केला. ज्ञानदाचे कातोरे सर यांनी इंग्रजीचे धडे दिले. एस.एस.सी. परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी अनुराधाने शिक्षकांनी दिलेले लिखाण आणि दररोज चार-पाच तास अभ्यास केला. कष्टाचे चीज झाले आणि एरंडोली येथील अनुराधा इथापे या शेतकऱ्यांच्या मुलीने तालुक्यात यशाचे शिखर सर केले आहे.
डॉक्टर व्हायचंय्
एस.एस.सी.ला चांगले मार्क मिळाले, पुढे १२ वी पर्यंत सायन्स करून मेडिकलला प्रवेश मिळवून माझे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी खूप परिश्रम करणार आहे.
-अनुराधा इथापे
परिस्थितीने घडविले
आई-वडील शेतात घाम गाळत होते. काका, काकी श्रीगोंद्यात टेलरचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत होते, अशा परिस्थितीत आपण शिकलो तर पुढे जाऊ अशी याची जाणीव होती आणि खडतर परिस्थितीतून मी घडले असे अनुराधा इथापे म्हणाली.

Web Title: Agricultural research in Erandoli