१४ दिवसांनंतर तनपुरे कारखान्यांच्या कामगारांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST2021-09-06T04:25:46+5:302021-09-06T04:25:46+5:30

माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे, माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांची विळद घाट येथे बैठक घेऊन कामगारांच्या ...

After 14 days, the workers of Tanpure factory went on a hunger strike | १४ दिवसांनंतर तनपुरे कारखान्यांच्या कामगारांचे उपोषण मागे

१४ दिवसांनंतर तनपुरे कारखान्यांच्या कामगारांचे उपोषण मागे

माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे, माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांची विळद घाट येथे बैठक घेऊन कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. कर्डीले, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी कामगारांशी सकारात्मक चर्चा करून वाटाघाटी केल्या. कामगारांच्या मागण्या पूर्णतः मान्य करून महिन्यातल्या दोन तारखा पगारासाठी निश्चित करण्यात आल्या. तर भविष्य निर्वाह निधीमध्ये दरमहा १ कोटी याप्रमाणे ६ महिन्याला ६ कोटी रुपये भरण्याचे मान्य केले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची उपदान व वेतनवाढ संचालक मंडळ व युनियनशी चर्चा करून देण्यात येईल. कामगार वसाहतीतील वीजपुरवठा आठ दिवसात सुरळीत करण्यात येईल. प्रत्येक पगाराची स्लिप देण्याचे संचालक मंडळाने मान्य केले. डिसेंबर २०२० नंतरचे थकीत पगार नियमित पगाराबरोबर देण्यात येतील, आदी लेखी मागण्यांचा लेखी प्रस्ताव कामगारांपुढे ठेवण्यात आला होता.

शिवाजी कर्डीले म्हणाले, कामगारांचे उपोषण होऊ नये असे मला वाटत होते. कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. कारखाना चालला पाहिजे तरच कामगारांचा रोजगार टिकणार आहे. कामगारांची देणी बंधनकारक आहेत. तुमचे राजकारण कुठेही करा, पण कारखान्यात राजकारण करू नका.

............

कामगार तन-मन-धनाने काम करतील

कामगार नेते इंद्रभान पेरणे म्हणाले, कामगारांच्या मागण्या मान्य करून घेत १४व्या दिवशी उपोषण सोडवले आहे. कामधेनूला चालना मिळाली नाही तर कामगारांची चूल बंद पडेल. कारखाना चालू झाल्यानंतर सर्व कामगार तन-मन-धनाने काम करतील.

( फोटो : कामगार)

Web Title: After 14 days, the workers of Tanpure factory went on a hunger strike