शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जूनमध्ये नगरकरांसाठी पुरेशी लस उपलब्ध होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:20 IST

अहमदनगर : कोरोनावरील लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही त्यामुळे अनेकजण लसीकरणापासून वंचित आहेत. शहराची लोकसंख्या विचारात घेऊन जूनमध्ये ...

अहमदनगर : कोरोनावरील लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही त्यामुळे अनेकजण लसीकरणापासून वंचित आहेत. शहराची लोकसंख्या विचारात घेऊन जूनमध्ये पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच आघाड्यांवर काम सुरू आहे. वेळप्रसंगी लस खरेदी करण्याचीही तयारी करण्यात येत असून, याबाबत कंपन्यांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

आमदार जगताप म्हणाले, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम सुरू आहे. लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. शहराची लोकसंख्या पाहता पाच लाखापर्यंत डोस उपलब्ध होणे गरजेचे आहे. परंतु, त्या तुलनेत लस उपलब्ध होत नाही. सर्वत्र लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे थेट कंपन्यांकडून लस खरेदी करण्याचा प्रयत्न आहे. महापालिकेने लस खरेदी करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केलेली आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. लसीकरणाचे काम पुढील तीन महिने चालणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागात मंगल कार्यालये भाडेतत्त्वावर घेऊन तिथे लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही. पुरेशी लस उपलब्ध झाल्यास दिवसभर लसीकरणाचे काम चालेल. त्यामुळे केंद्रांवर गर्दी होणार नाही. सर्वांना लस मिळेल, असे नियोजन करण्यात येत आहे. येत्या जूनमध्ये मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे, असे जगताप म्हणाले.

...

म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न

शहरात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांवरील उपचारासाठी इंजेक्शनची गरज भासत आहे. परंतु, हे इंजेक्शन उपलब्ध होत नाही. याबाबत नगर शहरातील एक शिष्टमंडळ आरोग्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असून, इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली आहे. आरोग्यमंत्र्यांनी नगरसाठी इंजेक्शन उपलब्ध करून देणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले आहे, असेही जगताप म्हणाले.

...

सूचना : फोटो आहे.