शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

दोन कृषी सेवा केंद्रांवर कारवाई

By admin | Updated: February 16, 2023 11:44 IST

श्रीरामपूर : माळवाडगाव (ता. श्रीरामपूर) येथील दोन कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून कारवाई केली.

श्रीरामपूर : माळवाडगाव (ता. श्रीरामपूर) येथील दोन कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकून कारवाई केली. खत विक्रीबाबत गंभीर स्वरूपाचे दोष आढळून आल्याने तेथील दोन्ही दुकानांमधील खताच्या ६१ गोण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली.तालुका कृषी अधिकारी विष्णू साळवे व पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गणेश अनारसे यांनी माळवाडगाव येथील दौलत रामकृष्ण दांगट यांच्या मालकीच्या अभिषेक कृषी सेवा केंद्र व सुमन पांडुरंग शिंदे यांच्या मालकीच्या जगदंबा कृषी सेवा केंद्रास भेट देऊन तपासणी केली. तेव्हा रासायनिक खत विक्रीबाबत गंभीर स्वरूपाच्या उणिवा आढळल्या. त्यामुळे दोन्ही दुकानांतील उपलब्ध रासायनिक खतांची विक्री बंद करण्याचा आदेश जागेवर देण्यात आला.जगदंबा कृषी सेवा केंद्रात खत परवान्याचे नूतनीकरण करवून न घेता खत विक्री करण्यात येत होती. तसेच खरेदी करण्यात आलेल्या खताची बिले नसणे, शेतकऱ्यास खरेदीची बिले न देणे, साठा नोंदवही न ठेवणे यासारख्या गंभीर त्रुटी आढळल्या. त्यामुळे या दुकानातील डी.ए.पी. २०:२०:०, १८:१८:१० या स्वरूपाच्या खताच्या ३७ गोण्यांची विक्री करण्यास मनाई करण्यात आली. या गोण्यांची किंमत ४८ हजार ५२५ रूपये आहे. अभिषेक कृषी सेवा केंद्रातही खताची खरेदी बिले न ठेवणे, साठा नोंदवहीत नोंद न ठेवणे, अहवाल सादर न करणे, गोदामातील साठा विक्री साठा यांचा ताळमेळ नसणे यासारख्या गंभीर त्रुटी आढळल्या. या दुकानातील १८ हजार ३५७ रूपये किंमतीच्या डी.ए. पी., युरिया, १०:२६:२६ या खताच्या २४ गोणांन्या विक्री बंद आदेश बजावण्यात आला.या दोन्ही दुकानांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती विष्णू साळवे यांनी दिली.