शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक भरारी पथकाची कारवाई : ८ लाखांची रोकड जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:01 IST

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कक्षांतर्गत असलेल्या भरारी व स्थिर सनिरीक्षण पथकाने केलेल्या वाहन तपासणी मोहिमेत शेवगाव तालुक्यातील सामनगाव परिसरात एका वाहनातून ८ लाख रूपये जप्त करण्यात आले.

शेवगाव : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कक्षांतर्गत असलेल्या भरारी व स्थिर सनिरीक्षण पथकाने केलेल्या वाहन तपासणी मोहिमेत शेवगाव तालुक्यातील सामनगाव परिसरात एका वाहनातून ८ लाख रूपये जप्त करण्यात आले. ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा केल्याची माहिती शेवगाव तहसीलच्या निवडणूक शाखेतून देण्यात आली.लोकसभा निवडणुकीसाठी शेवगाव पाथर्डी तालुक्यात ३ स्थिर सनिरीक्षण पथक तसेच दोन फिरत्या भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय तीन व्हिडीओ सनिरीक्षण पथक तसेच एक व्हिडीओ पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकापैकी एका पथकाने तालुक्यातील शेवगाव नगर राजमार्गावर केलेल्या वाहन तपासणी मोहिमेत सामनगाव परिसरात एका कारमधून ८ लाख रुपयांची रोख रक्कम जमा केल्याची घटना रविवारी घडली. पथकाने केलेल्या कारवाईची माहिती मिळताच शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे खर्च नियंत्रण निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने ही रोकड सील करून जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली. दरम्यान मुलाच्या लग्नानिमित्त सोन्याचे दागिने करण्यासाठी ही रक्कम बँकेतून काढल्याची माहिती संबंधित व्यक्तीने पथकाला दिली. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रेही वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखविली. कागदपत्रांची शहानिशा करून त्यावर निर्णय देण्याचा अधिकार जिल्हास्तरीय समितीकडे असल्याने याबाबत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती देण्याचे संबंधितांनी सांगितल्याची माहिती तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांनी दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर