Accident: श्रीगोंद्यात भीषण अपघात, मित्राला सोडायला जात असताना कार ट्रेलरवर धडकून तीन मित्रांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 08:25 IST2022-02-13T08:25:13+5:302022-02-13T08:25:58+5:30
Accident In Shrigonda : मित्राला सोडविण्यासाठी जात असताना उसाच्या ट्रेलरला पाठीमागून कारची धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन मित्रांचा मृत्यू झाला.

Accident: श्रीगोंद्यात भीषण अपघात, मित्राला सोडायला जात असताना कार ट्रेलरवर धडकून तीन मित्रांचा मृत्यू
अहमदनगर - मित्राला सोडविण्यासाठी जात असताना उसाच्या ट्रेलरला पाठीमागून कारची धडक बसून झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन मित्रांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री एक वाजता श्रीगोंद्यातील हाॅटेल अनन्यासमोर घडली. या अपघातात राहुल सुरेश आळेकर (22 ,श्रीगोंदा), केशव सायकर (22, काष्टी) आणि आकाश रावसाहेब खेतमाळीस (18 , श्रीगोंदा) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. आकाश आणि राहुल हे केशव सायकरला सोडविण्यासाठी काष्टीला जात असताना अपघात झाला. तिनही मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने श्रीगोंदा काष्टीत शोककळा पसरली आहे.