शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय विवाहासाठी ६६ लाखांचे अनुदान

By admin | Updated: June 26, 2023 11:30 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून आंतरजातीय विवाह करणार्‍या जोडप्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात येते.

अहमदनगर : समाजातील जातीभेदाची कडी नष्ट व्हावी, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून आंतरजातीय विवाह करणार्‍या जोडप्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. गत वर्षी जिल्हा परिषदेने १४६ जोडप्यांचे योजनेसाठी प्रस्ताव मंजूर केले असून त्यापोटी ६६ लाख ३५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. समाजाला जातीची कीड लागलेली आहे. सवर्ण आणि मागासवर्गीय अशी भेदाभेदी सुरू आहे. ही भेदाभेदी नष्ट करण्यासाठी शासन पातळीवरून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. काही प्रमाणात आंतरजातीय विवाहाला मान्यता मिळत असली तरी समाजात अद्यापही त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने दरवर्षी आंतरजातीय विवाह करणार्‍या जोडप्यांचा सन्मान करण्यात येऊन त्यांना प्रोत्साहन योजनेचा लाभ देण्यात येतो. पूर्वी आंतरजातीय विवाह करणार्‍या जोडप्यांना १५ हजार रुपये प्रमाणे लाभ देण्यात येत होता. यात दोन वर्षापासून वाढ करण्यात येत आहे, ही रक्कम ५० हजार रुपये करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात १५ हजार प्रमाणे लाभ मिळविणारे १९ जोडपे असून ५० हजार रुपये प्रमाणे लाभ मिळविणारे १२७ जोडपे आहेत. यांना ६६ लाख ३५ हजारांचे अनुदान देण्यात येणार आहेत. आंतरजातीय विवाह करणार्‍या जोडप्यांत खुल्या प्रवर्गातील ९१, एससी प्रवर्गातील ६३, एसटी प्रवर्गातील १८, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील २८, विमा प्रवर्गातील ४० तर विजभज प्रवर्गातील ५२ जणांचा समावेश असल्याची माहिती समाज कल्याण अधिकारी प्रदीप भोगले यांनी दिली. (प्रतिनिधी) तालुकानिहाय लाभ मिळणारे लाभार्थी: अकोले ११, पारनेर ४, पाथर्डी १, श्रीगोंदा ३, राहुरी ५, राहाता ९, शेवगाव ४, जामखेड १२, कोपरगाव ८, नेवासा ५, संगमनेर १२, नगर ६५ आणि कर्जत २ अशा १४६ जोडप्यांचा समावेश आहे.