शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

५३ गावात ग्रामसभा तहकूब

By admin | Updated: August 17, 2015 00:02 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील १ हजार १९७ ठिकाणी ग्रामसभा झाल्या असून ५३ गावात वेगवेगळ्या कारणामुळे ग्रामसभा तहकूब झाल्या आहेत.

अहमदनगर : स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा सक्तीच्या करण्यात आल्या होत्या. त्यानुसार १ हजार १९७ ठिकाणी ग्रामसभा झाल्या असून ५३ गावात वेगवेगळ्या कारणामुळे ग्रामसभा तहकूब झाल्या आहेत. पुरेशा गणसंख्ये अभावी या सभा तहकू ब झाल्या असून ६२ ठिकाणी पुढील आठ दिवसात ग्रामसभा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने देण्यात आली. शनिवारी स्वातंत्र्यदिनी जिल्हाभर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’अभियान, वॉटर बजेट, जलयुक्त शिवार, रोजगार हमी योजनेचा वर्षभराचा आराखडा, गावात झालेली अतिक्रमणे आणि ग्रामस्थांच्या असणाऱ्या तक्रारी यासह अन्य विषयाचे सक्तीने वाचन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. विशेष करून प्रत्येक गावात होणाऱ्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी उपस्थित राहून त्या ठिकाणी आपल्या समस्या आणि तक्रारी मांडण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात १ हजार १९७ गावात सुरळीत आणि शांततापूर्ण वातावरणात ग्रामसभा झालेल्या आहेत. ६२ ठिकाणी निरीक्षक उपलब्ध न झाल्याने त्या ठिकाणी पुढील आठ दिवसात ग्रामसभा होणार आहेत. तर ५३ ठिकाणी ग्रामसभा तहकूब करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये नव्याने ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत. मात्र त्यांच्याकडे अद्याप पदभार आलेला नाही. यामुळे त्यांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवली आणि जे पराभूत झालेले आहेत तेही या सभेकडे आले नाहीत. अशा गावात ग्रामसभा झालेल्या नाहीत. (प्रतिनिधी)