पाचेगावात बंगल्याचे कुलूप तोडून १५ हजारांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST2021-07-15T04:16:40+5:302021-07-15T04:16:40+5:30

पाचेगाव : नेवासा तालुक्यात पाचेगाव येथे बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून १५ हजार रुपये रोख व मोबाइल चार्जर चोरी गेल्याची ...

15,000 stolen by breaking the lock of a bungalow in Pachegaon | पाचेगावात बंगल्याचे कुलूप तोडून १५ हजारांची चोरी

पाचेगावात बंगल्याचे कुलूप तोडून १५ हजारांची चोरी

पाचेगाव : नेवासा तालुक्यात पाचेगाव येथे बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून १५ हजार रुपये रोख व मोबाइल चार्जर चोरी गेल्याची घटना शनिवारी घडली.

दिनेश दत्तात्रय कुलकर्णी (वय ७०, धंदा-शेती) यांचा पाचेगाव येथे रस्त्यालगत बंगला असून त्यांची दोन्ही मुले नोकरीनिमित्त श्रीरामपूर येथे राहतात.

शनिवारी (दि.१०) सायंकाळी पाचच्या सुमारास दिनेश कुलकर्णी हे बंगला बंद करून आपल्या मुलाकडे गेले होते. याच संधीचा फायदा घेत शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील, कपाटातील साहित्याची उचकापाचक केली. गादीखाली ठेवलेल्या पुस्तकातील १५ हजार रुपये रोख व शंभर रुपये किमतीचा एक मोबाइल चार्जर असा एकूण १५ हजार शंभर रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.

शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक विजय करे, संजय बडे यांनी रविवारी घटनास्थळी भेट दिली होती. चोरी प्रकरणाचा नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास नेवासा पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मोहन शिंदे हे करीत आहेत.

140721\img_20210711_175040.jpg~140721\img_20210714_175506.jpg~140721\img_20210714_175522.jpg

पाचेगावात बंगल्याचे कुलूप तोडून पंधरा हजाराची चोरी~पाचेगावात बंगल्याचे कुलूप तोडून पंधरा हजाराची चोरी~पाचेगावात बंगल्याचे कुलूप तोडून पंधरा हजाराची चोरी

Web Title: 15,000 stolen by breaking the lock of a bungalow in Pachegaon