संगमनेरात एकाच दिवसात १४८ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST2021-03-26T04:20:26+5:302021-03-26T04:20:26+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच संगमनेर शहरात कोरोना रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली होती. गेल्या आठ दिवसांपासून ...

148 corona positive in a single day at Sangamnera | संगमनेरात एकाच दिवसात १४८ कोरोना पॉझिटिव्ह

संगमनेरात एकाच दिवसात १४८ कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच संगमनेर शहरात कोरोना रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली होती. गेल्या आठ दिवसांपासून प्रत्येक दिवशी संगमनेर शहर व तालुक्यात कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. यंदाच्या वर्षी जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. परंतु मार्च महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसागणिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. १९ ते २५ मार्च या सात दिवसांत संगमनेर तालुक्यात ४९८ रुग्ण आढळून आले.

---------------

१९ ते २५ मार्च कोरोना रुग्णसंख्या

तारीख रुग्णसंख्या

१९ मार्च ५७

२० मार्च ४३

२१ मार्च ७१

२२ मार्च ८४

२३ मार्च ६६

२४ मार्च २९

२५ मार्च १४८

-------------

संगमनेर तालुक्यात कोरोनाची लागण झालेले ५५४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यांच्यावर शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, साबणाने हात स्वच्छ धुवावेत. हे आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.

डॉ. सुरेश घोलप, तालुका आरोग्य अधिकारी, संगमनेर

Web Title: 148 corona positive in a single day at Sangamnera