Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - बुधवार, 22 जानेवारी 2020
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 08:23 IST2020-01-22T08:23:11+5:302020-01-22T08:23:44+5:30
आज जन्मलेली मुलं... कोणती असेल रास?, कसा होईल प्रवास?

Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - बुधवार, 22 जानेवारी 2020
धनु राशीत जन्मलेली आजची मुले चंद्र-हर्षल शुभयोगामुळे वेगवान विचारांची यशस्वी कृती करणारी असतील. विद्येत यश मिळवतील. आधुनिकशास्त्राशी संधीतून मुले मोठी होत राहतील.
धनु राशी भ, ध अद्याक्षर.
- अरविंद पंचाक्षरी
आजचे पंचांग
बुधवार, 22 जानेवारी 2020
भारतीय सौर 02 माघ 1941
मिती पौष वद्य त्रयोदशी 25 क. 49 मि.
मूळ नक्षत्र, 24 क. 20 मि., धनु चंद्र
सूर्योदय 07 क. 16 मि., सूर्यास्त 06 क. 24 मि.
प्रदोष
दिनविशेष
1897 - संगीतकार दिलीपकुमार रॉय यांचा जन्म.
1901 - भारतीय मानवशास्त्रज्ञ निर्मलकुमार बोस यांचा जन्म.
1922 - मराठी लेखिका शांता बुद्धिसागर यांचा जन्म.
1934 - अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक विजय आनंद यांचा जन्म.
1963 - डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालयाची स्थापना.
1972 - राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन.