शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

मैत्री बंधाचा आदर काळाची गरज...    

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 8:31 PM

मानवी मनाला सौंदर्य, विद्वत्ता, स्वभाव, ऐश्वर्य, व्यक्तिमत्व यासारख्या गोष्टी आकर्षित करतात...

डॉ. दत्ता कोहिनकर -                प्रेम जीवनाच्या उत्पत्तीपासून अस्तित्वात आहे तर विवाह संस्था ही पाच हजार वर्षांपासूनची सामाजिक व्यवस्था आहे. प्रेम बायोलॉजिकल आहे तर लग्न ही सोशल संकल्पना आहे. सामाजिक व्यवस्था उलथू नये म्हणून लग्नपद्धती उदयास आली. मानवी मनाला सौंदर्य, विद्वत्ता, स्वभाव, ऐश्वर्य, व्यक्तिमत्व यासारख्या गोष्टी आकर्षित करतात. लग्नानंतरही या सगळ्याच गोष्टी आपल्या जोडीदाराकडे असतीलच असे नाही. लग्न झाले तरी सात फेरे घेऊन किंवा कबूल है म्हणून आपले मन बदलत नाही. ज्या गोष्टी आपल्या जोडीदाराकडे नाहीत व त्याच्याकडून मिळत नाहीत आपला मेंदू इतर लोकांमध्ये त्या गोष्टी दाखवतो व त्यांच्याकडे आकर्षित करून तुम्हाला व्यक्त होण्यासाठी भाग पाडतो. काहीजण आपण विवाहित आहोत या विचारांनी या भावनांचे दमन करतात तर काही जण या भावना कृतीत उतरतात व लग्नानंतरही इतरांच्या प्रेमात पडतात. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एकटेपणा व त्यामुळे मन मोकळं करायला प्रियजनांचा अभाव यामुळे मेंदू तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. म्हणून तुम्हाला मित्र - मैत्रिणी असतील तर आपल्या जोडीदाराबरोबर याबाबत पारदर्शकता ठेवा. या नात्यात पवित्रता ठेवा. नवरा-बायकोने एकमेकांच्या भावनांचा मित्र-मैत्रिणींचा स्वीकार करून एकमेकांना व्यक्तिस्वातंत्र्य, पुरेशी मोकळीक व विश्वास देऊन प्रत्येक नात्यात लक्ष्मण रेषा व पवित्रता ठेवली तर  मैत्री बांधाचा आदर केला होईल आणि नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही.  मनाला प्रेम हवं असतं. गालिब उगीच म्हणत नाही - "कहते है, जिसको इश्क, खलल है दिमाग का"  कौन्सलिंग नंतर राणी हसली व अपराधीपणाची तिची भावना दूर झाली व या नात्यात लक्ष्मण रेषा व पवित्रता ठेवून आपल्या पती राजाबरोबर पारदर्शकता ठेवण्यास तयार झाली. खरोखर भावभावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाला मित्र-मैत्रिणींची गरज असते. काही जण त्या भावना समाज बंधनाचा पगडा घेऊन नाकारतात. तुम्ही जर तुमचं कोणावर प्रेम आहे, हे मान्य केलं तर तुमच्या प्रामाणिकपणाला सलाम.

म्हणतात ना, "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे."  नवरा बायकोने एकमेकांच्या मित्र मैत्रीणीचा स्वीकार करून एकमेकांवर विश्वास ठेवून एकमेकांना समजुन घेणे ही आज काळाची गरज आहे. या नात्यात विश्वासाला तडा न जाता आनंदाची अनुभूती घ्या. हा माझा मित्र किवां मैत्रीण हे आपल्या जोडीदाराला निर्भयपणे सांगता येईल एवढा एकमेकांवर विश्वास ठेवा.एकमेकांना स्पेस दया.जो या विश्वासाला तडा देईल त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच असते यावर विश्वास ठेवा.नवरा बायकोने एकमेकांना खुपच नजरकैदेत व बंधनात ठेवले तर विवाहबाह्य  संबंधांचा जन्म होऊ शकतो.म्हणून आजच्या या विभक्त कुटूंब पद्धतीत एकमेकांच्या मित्र मैत्रिणींचा आदराने स्वीकार करा, ही काळाची गरज आहे.

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिकrelationshipरिलेशनशिपmarriageलग्न