शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

देवा तूंचि गणेशु

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 19:49 IST

आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी. अर्थात श्रीगणेश चतुर्थी. आज पार्थिव गणेश पूजन करावे, असे शास्त्रमत आहे. प्राचीन काळापासून घराघरातून या दिवशी गणेश पूजन होत आले आहे. थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांनी या उत्सवास व्यापक स्वरुप दिले.

- प्रमोद महाराज जगताप 

आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी. अर्थात श्रीगणेश चतुर्थी. आज पार्थिव गणेश पूजन करावे, असे शास्त्रमत आहे. प्राचीन काळापासून घराघरातून या दिवशी गणेश पूजन होत आले आहे. थोर देशभक्त लोकमान्य टिळक यांनी या उत्सवास व्यापक स्वरुप दिले. आज हा उत्सव जगभरात भव्य आणि दिव्य प्रमाणात साजरा होताना दिसतो आहे. अशा या पर्वकाळी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीतील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी मांडलेला ‘साहित्य गणेश’ अभ्यासणार आहोत . ‘ॐ नमोजी आद्या, वेदप्रतिपाद्या,जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा’’ जगाच्या तत्वज्ञानाला गवसणी घालणाऱ्या ग्रंथराज श्रीज्ञानेश्वरीचा प्रारंभ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी श्री. गणेशस्तवनाने केला आहे. पुर्वासुरींचा आदर्श समोर ठेवला असता ग्रंथारंभी मंगलाचरण करावे, असा शिष्ट संप्रदाय आहे. ‘‘ग्रंथकारांते वाट पुसतु...,’’ वाटचाल करणारे ज्ञानोबाराय आपल्या ग्रंथाचे मंगलाचरण करतात. बहुतेक ग्रंथाचा आरंभ श्रीगणेशाय नम: अशा नमनाने झालेला पाहायला मिळतो. ग्रंथलिखाणात कोणतेही विघ्न येऊ नये, तो ग्रंथ सिद्धिस जावा, तसेच श्रीगणराजांना अग्रपूजेचा मान असल्याने ज्ञानेश्वर महाराज गणपतीस नमस्कार करतात. नमनाचे एकूण तीन प्रकार आहेत. आशीर्वादरूप, नमस्क्रियारूप आणि वस्तुनिर्देशरूप. ग्रंथारंभीच्या या वीस ओव्यांत श्रीमाऊलींनी यथार्थ असे नमास्क्रियारूप मंगलाचरण केले आहे. श्रीज्ञानोबारायांनी केलेले गणेशस्तवन सर्वोत्कृष्ट अशा स्वरूपाचे आहे. ओंकार हा शब्द ब्रम्हवाचक आहे. ते निर्गुण ब्रम्हाचे , शुद्धब्रम्हाचे प्रतीक आहे. ॐकार अशा निर्गुण ब्रम्हाला गणेशाचे रूप मानून श्रीज्ञानोबाराय सगुण गजाननाचे वर्णन करतात. ‘‘त्वं प्रत्यक्ष ब्रम्हासि असे गणपत्यथर्वशिर्षांत म्हटलेच आहे.हे ॐकारा तु सर्वांचे आदिकरण आहेस, तु वेदाच्या प्रतिपादनाचा विषय आहेस. तुला माझा नमस्कार असो. हे ॐकारा तु स्वत:च स्वत:ला जाणण्यास योग्य आहेस. समर्थ आहेस. अशा आत्मस्वरूप ॐकारा तुझा जयजयकार असो. ‘‘देवा तूंचि गणेशु, सकलमति प्रकाशु, म्हणे निवृत्तीदासु, अवधारिजो जी...’ओम हे गणेशाचे प्रतिक आहे. वरील ओवीत वर्णन केलेले ॐकारस्वरूपी परब्रम्ह म्हणजेच सकलांच्या बुद्धीचा प्रकाशक म्हणजे श्रीगणेश होय . संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचे सदशिष्य श्री. ज्ञानोबाराय प्रार्थना करतात. हे प्रभो, ग्रंथनिर्मितीकरिता मजकडे लक्ष द्यावे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८