शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा आणि हिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 02:33 IST

जितके जास्त निंदक ज्याच्या नशिबी आलेत समजावे तितकी जास्त प्रगती त्याच्याकडून नियतीला हवी आहे.

- विजयराज बोधनकर

आपली निंदा करणारा किंवा आपल्याला छळणारा जीव आपल्या आयुष्यात येतो हे आपलं सद्भाग्य म्हणावं. तो आपल्या झोपल्या बुद्धीला जागं करतो, जोश निर्माण करतो, मनात खळबळ निर्माण करून देतो. आपली उगाच खालची जागा दाखवून देतो. मग छळवणूक सहन करणारा त्याला दाखवून देतो की, बघ मी कसा आयुष्यात पुढे जाऊ शकतो. आपली कुणी चेष्टा करतो तेव्हा आपल्या सन्मानाला ठेच पोहोचते आणि आपली संपूर्ण ऊर्जा पणाला लावून त्याच्या चेष्टेला उत्तरं देताना आपली कार्यक्षमता वाढवून घेत राहतो.

फक्त आपण सकारात्मक वृत्तीने ही बाब स्वत:च्या नजरेत आणून द्यायला हवी. निंदा करणारा, अपमान करणारा आपल्या कुंडलीतील शनी जरी वाटत असला तरी आपल्याला खडबडून जागं करणारी ती एक छुपी प्रेरणाच असते. उगाच का तुकाराम महाराजांनी म्हटलं की, निंदकाचे घर असावे शेजारी. पांडवांच्या कुंडलीत शंभर निंदक होते म्हणून त्यांचा भव्य विजय झाला. त्यांनी युद्ध करायला भाग पाडलं. ज्यांनी ज्यांनी युद्ध स्वीकारलं तेच अजरामर झालेत. निंदा करणारा कधीच प्रगती करू शकत नसला तरी तो इतरांच्या प्रगतीला प्रेरक ठरत जातो.

जितके जास्त निंदक ज्याच्या नशिबी आलेत समजावे तितकी जास्त प्रगती त्याच्याकडून नियतीला हवी आहे. तुमचा मत्सर करणारे तुमच्या प्रगतीवर अस्वस्थ होत असतात. म्हणजे तुम्ही प्रगतिपथावर आहात असं समजावं. फक्त आपण कुणाची निंदा करू नये. कारण आपल्याला प्रगती करण्यासाठी नियतीने आपल्याला जन्माला घातलंय आणि त्या प्रगतीला पोषक बनविण्यासाठी निंदकही नियतीने आपल्याला पदरी पाठविले. निंदकाला कधीही कमी लेखू नये. याचं कारण असं आहे की नियतीने तुम्हावर केलेली ती कृपादृष्टी असते. जो छळला जातो तोच उत्तम मार्गाकडे वळतो. कोळशातच शेवटी हिरे सापडतात. कोळसा आणि निंदा करणारा समान भूमिकेत असतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक