Change perspective, life will change ... | दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल...
दृष्टिकोन बदला, जीवन बदलेल...

- डॉ. दत्ता कोहिनकर

डोंट वरी, बी हॅपी हे हॅपी नावाचं औषध शोधण्यासाठी लोक जगभर फिरतात. खरंतर ते आपल्या मनातच असतं. नव्वद टक्के आजार मानसिक असतात. नकारात्मक विचार हे त्याचं मूळ असतं. एक राक्षस लोकांना  छळायचा. एकदा डेव्हिड हा पोरगेलासा मेंढपाळ त्या खेड्यातील नातेवाइकांना भेटायला आला. त्यानं विचारलं, तुम्ही या राक्षसाशी लढत का नाही? भयग्रस्त गावकरी म्हणाले, खूपच मोठ्या आकाराचा आणि बलाढ्य आहे तो. यावर डेव्हिड म्हणाला,खूप मोठ्या आकारमानामुळे नेम धरण्याची आवश्यकता नाही. कसेही दगड, विटा, सळया भिरकावल्या, तरी त्याला लागतीलच.गावकऱ्यांनी दगडफेक, भालाफेक करून राक्षसाला ठार मारले. राक्षसाच्या प्रचंड आकारमानाकडे डेव्हिड वेगळ्या दृष्टिकोनातून पाहात होता, म्हणून त्या संकटाचं निराकरण झालं.
यशस्वी व्हायचं असेल, तर विचारांच्या सकारात्मकतेची प्रचंड गरज असते, असे विख्यात मानसशास्त्रज्ञ कार्ल जुंग यांनी म्हटले आहे. सकारात्मक व नकारात्मक हे दोन्ही विचार संसर्गजन्य आहेत. या विचारांचा आपल्यावर व आपल्या सहवासात येणा?्यांवर परिणाम होतो. सकारात्मक माणसाभोवती विशिष्ट वलय निर्माण होत असल्यामुळे ते इतरांना आकर्षित करतात. असा माणूस आनंदी, प्रसन्न असतो. आपण स्वत:शी काय बोलतो यावर आपले भवितव्य अवलंबून असते, त्यालाच ' सेल्फ टॉक'  म्हणतात. नकारात्मक विचार करणाऱ्याच्या आयुष्यात नेहमी दु:ख व नैराश्यच येते, म्हणून नेहमी स्वत:बद्दल सकारात्मक बोला. सकारात्मक विचार करणारा माणूस बंद घड्याळाकडेही दिवसातून दोन वेळा अचूक वेळ दाखवणारे घड्याळ या दृष्टिकोनातून पाहतो. सकारात्मक विचार करणाऱ्याला अपयश ही यशाकडे नेणारी पायरी वाटते, तर नकारात्मक विचार करणाऱ्याला तेच अपयश मार्गातील अडथळा वाटतो. डॉ. जॉईस ब्रदर्स म्हणतात, की यश ही मानसिक स्थिती आहे. तुम्हाला यश हवं असेल, तर तुम्ही यशस्वी झाला आहात असा विचार करा. सकारात्मक विचारसरणी ही उज्ज्वल भवितव्याचा दाखला असतो. आनंदी  माणूस हा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीमुळे आनंदी नसतो, तर स्वत:ची विशिष्ट मनोवृत्ती, विचारांमुळे आनंदी असतो. मन सकारात्मक व निर्मल करण्यासाठी रोज सकाळी - संध्याकाळी १० ते १५ मिनिटे मांडी घालून ध्यान करा. आपल्या श्वासाचे तटस्थपणे निरीक्षण करा, म्हणजेच डोळे बंद करून त्याला जाणत राहा; त्याला कुठलाही अंक, मंत्र न जोडता नैसर्गिक श्वासाला जाणता-जाणता मन एकाग्र व शुद्ध करा. सकारात्मक विचार प्रबळ करण्यासाठी व नकारात्मकता धुवून काढण्यासाठी एवढंच म्हणा- 'येरे घना येरे घना ,न्हाऊ घाल माझ्या मना' यासाठी रोज ध्यान कर
 

Web Title: Change perspective, life will change ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.