रापमच्या बसेस रिमोल्ड टायरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 11:40 PM2018-08-22T23:40:24+5:302018-08-22T23:40:56+5:30

जिल्ह्यातील रापमच्या बसेसला सध्या घरघर लागल्याचे दिसून येते. जिल्ह्यातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या शिवशाही बसेस योग्य भारमान मिळत नसल्याचे कारण पुढे करून रापमच्या वर्धा विभागाने भंडारा विभागाकडे वळत्या केल्या आहेत. असे असताना महिन्याकाठी १२० नव्या तर २४९ रिमोल्ड टायरचा वापर केला जात असल्याचे पुढे आले आहे.

Rapam's Buses Rimold Tire | रापमच्या बसेस रिमोल्ड टायरवर

रापमच्या बसेस रिमोल्ड टायरवर

Next
ठळक मुद्देमहिन्याकाठी १२० नव्या तर २४९ रिमोल्ड टायरचा वापर

गौरव देशमुख।
लोकमत न्यूज नेटवर्क
वायगाव (नि.) : जिल्ह्यातील रापमच्या बसेसला सध्या घरघर लागल्याचे दिसून येते. जिल्ह्यातून नव्याने सुरू करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या शिवशाही बसेस योग्य भारमान मिळत नसल्याचे कारण पुढे करून रापमच्या वर्धा विभागाने भंडारा विभागाकडे वळत्या केल्या आहेत. असे असताना महिन्याकाठी १२० नव्या तर २४९ रिमोल्ड टायरचा वापर केला जात असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे रापमच्या बसेस रिमोल्ड टायरवर असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
जिल्ह्यातील रापमच्या अनेक बसेसच्या खिडकींच्या काचा तुटलेल्या असून काही बसेस अर्ध्यातच दम टाकत असल्याचे बघावयास मिळते. इतकेच नव्हे तर काही बसेसचे आसन फाटलेले आहेत. त्यामुळे नेहमीच प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो. नागरिकांना योग्य प्रवासी सेवा देता यावी, यासाठी तत्कालीन विभाग नियंत्रक गव्हाळे यांच्या कार्यकाळात विशेष उपक्रम राबविण्यात आला होता. त्यानंतर रापमने सौजन्य नमस्कार उपक्रम राबविला. परंतु, तोही प्रवाशांना रापमच्या बसेसकडे आकर्षित करण्यासाठी पाहिजे तसा असर करू शकला नाही.
जिल्ह्यातील रापमच्या पाचही आगारात एकूण ३२० बसेस असून महिन्याकाठी या गाड्यांना ३६९ टायर लावल्या जातात. यापैकी २५९ टायर रिमोल्ड केलेले असतात. तर केवळ १२० नवीन टायरची खरेदी असल्याचे सांगण्यात आले.

पाच आगारात एकूण ३२० बस गाड्या
जिल्ह्यातील रापमच्या पाच आगारात ३२० बसेस असून त्या बसेस दररोज प्रवाशांना सेवा देण्यासाठी सोडण्याचे नियोजन केले जाते. परंतु, मोठ्या प्रमाणात रिमोल्ड टायरचा वापर होत असल्याने बहूदा या धावणाऱ्या रापमच्या बसगाड्या अर्ध्या प्रवासातच पंक्चर होतात. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. याकडे लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.

वर्षाला ४,४२८ टायरची मागणी
जिल्ह्यातील पाचही आगारातील एकूण ३२० बस गाड्यांसाठी प्रत्येक महिन्याला ३६९ तर वर्षाकाठी ४ हजार ४२८ टायरची मागणी राहते. परंतु, प्रत्येक वर्षी केवळ १ हजार ४४० नवीन टायरची खरेदी केली जात असल्याचे वास्तव आहे. नवीन टायरची खरेदी मागणीच्या तुलनेत नाममात्र होत असल्याने रिमोल्ड टायरचा वापर करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.

आमच्या आगारात उत्कृष्ट बसेस आहेत. मागणीनुसार आम्ही चांगल्या ग्रेडच्या रिमोल्ड टायरचा बसच्या मागील चाकाकरिता वापर करतो. या विषयावर आमचा आगार विशेष लक्ष देते.
- अतुल डाहाके, विभागीय भंडार अधिकारी, वर्धा.

Web Title: Rapam's Buses Rimold Tire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.