गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 10:37 PM2018-02-13T22:37:13+5:302018-02-13T22:38:20+5:30

A hailstorm affected will not be deprived of help | गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही

गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही

Next
ठळक मुद्देरामदास तडस : देवळी व आर्वी तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी

ऑनलाईन लोकमत
देवळी : शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याकरिता कृषी विभागाने मदत कक्ष स्थापन करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे त्वरित पंचनामे पूर्ण करावेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मदतीसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीचे निर्देशही खा. रामदास तडस यांनी दिले.
जिल्हातील सर्व तालुक्यांत अनेक गावांना रविवारी आणि सोमवारी गारपिटीचा तडाखा बसला. रबी व खरीप तसेच फळबागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानीची पाहणी मंगळवारी सकाळी खा. रामदास तडस यांनी केली. यावेळी देवळी तालुक्यातील नाचणगाव, विजयगोपाल, आपटी, कोळोणा (घोडेगाव), शेंदरी, इंझाळा, तळणी, शिरपूर, कोटेश्वर या गावांमध्ये प्रत्यक्ष खा. तडस यांच्यासोबत जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे, दीपक फुलकरी, मिलिंद भेंडे, युवराज खडतकर, शंकर उईके, स्वप्नील खडसे, तलाठी राऊत , गजानन राऊत, नितीन होले, गजानन तिवरे, भीमराव नागपुरे, ज्ञानेश्वर टिपले, प्रवीण लोखंडे यांनी भेट दिली.
रविवारी दुपारी व सोमवारी पहाटे तथा रात्री पावसाने चांगलाच कहर केला. देवळी तालुक्यातील पुलगाव, नाचणगाव, विजयगोपाल, आपटी, कोळोणा (घोडेगाव), शेंदरी, इंझाळा, पिंपळगाव, वडाळा, सोरटा, सालफळ, मार्डा, तांभा, निमगव्हाण, मुरदगाव, सोनेगाव, दिघी, अडेगाव, बोपापूर तर आर्वी तालुक्यात खरांगणा, मोरांगणा, पिंपळखुटा, विरूळ, रसुलाबाद, रोहणा यासह अन्य गावांतही मोठ्या प्रमाणात गारपीट झाले. गारपीट व वाऱ्यामुळे गहू पूरता झोपला तर चण्याच्या घाट्या फुटल्या. यामुळे शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले. शेतात पिकांवर गारांचे आच्छादन असल्याने पिकेक नेस्तनाबूत झालीत. या गारपिटीमुळे शेतकरी पूरता अडचणीत आला आहे. पावसामुळे शेतातील कापूस ओला झाला. शिवाय फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
याप्रसंगी खा. तडस यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दूरध्वनीवरून जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावातील नुकसानाचे त्वरित पंचनामे करावे. शेतकऱ्यांना प्राथमिक मदत मिळवून द्यावी, अशा सूचना दिल्या. शिवाय तहसीलदार, कृषी अधिकारी, कृषी सहायक व तलाठी यांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात आलेत.
आठ गावांत प्राथमिक सर्वेक्षण
मंडळ अधिकारी, तलाठी व कृषी सहायकांनी मंगळवारी शेंदरी, सोनोरा, कांदेगाव, घोडेगाव, नाचणगाव, कोळोणा, पुलगाव, दहेगाव येथील नुकसानग्रस्त भागाचे प्राथमिक सर्वेक्षण करून अहवाल सादर केला आहे.

Web Title: A hailstorm affected will not be deprived of help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस