लाइव न्यूज़
 • 12:19 PM

  मुंबई - भाजपध्यक्ष अमित शाह एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर, वसंतस्मृती सभागृहात दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही हजर

 • 12:13 PM

  पंढरपूर - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना मराठा आंदोलकांनी अडवले. सहकारमंत्र्यांसोबत चर्चा सुरू

 • 11:44 AM

  पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना पोलिसांनी बजावली नोटिस. मुख्यमंत्री आल्यास गोंधळ होण्याची शक्यता, पोलिसांनी घेतली खबरदारी.

 • 11:43 AM

  चंद्रपूर : छोटा नागपूर मार्गावरील एका शेतात एकाच वेळी शिरले तीन वाघ, वाघांच्या हल्ल्यात एकाच मृत्यू. वनविभागाने वाघांना हुसकावून लावले.

 • 11:34 AM

  मुंबई : भारतमाता चित्रपटगृहासमोरील पदपथावर मराठा क्रांती मोर्चाकडून ठिय्या आंदोलनास सुरूवात

 • 11:09 AM

  मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते भारतमाता चित्रपटगृहाबाहेर जमा होण्यास सुरूवात.

 • 11:00 AM

  सोलापूर-मंगळवेढा मार्गावर माचनूर येथे रास्ता रोको. सकल मराठा समाजाचे आंदोलन. सहकार मंत्री उपस्थित. आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न.

 • 11:00 AM

  आषाढी एकादशीची वारी निर्धोक पार पडली पाहिजे, सर्वांनी सकारात्मक योगदान देण्याची गरज. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे आवाहन. मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांचे विधान.

 • 10:37 AM

  मुंबई : सायन रुग्णालयाबाहेरील दगडफेकप्रकरणी 100 जणांविरोधात गुन्हा दाखल, सायन पोलिसांची कारवाई , 5 पोलीस जखमी, 3 वाहनांचे नुकसान

 • 10:24 AM

  सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील वळसंगच्या अन्नपूर्णा हॉटेलजवळ भीषण अपघात. ट्रकवर दुचाकी आदळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू.

 • 09:47 AM

  पिंपरी : अजंठानगर येथे 10 ते 15 तरुणांचा राडा, हातात लाकडी दांडके घेऊन 7 ते 8 वाहनांची तोडफोड. पुनर्वसन इमारतीत झालेल्या भांडणातून राडा. निगडी पोलीस करताहेत तपास.

 • 09:43 AM

  सोलापूर : आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी अद्याप मुखमंत्र्यांचा दौरा निश्चित नाही, पंढरपुरात वरिष्ठ पोलिसांची बैठक सुरू. पंढरपुरातील सर्व कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता, फक्त महापूजेसाठी मुख्यमंत्री येणार- सूत्रांची माहिती.

 • 09:38 AM

  हरियाणा : मोरनी सामूहिक बलात्कार प्रकरणी पंचकुला पोलिसांना आणखी एका आरोपीला केली अटक.

 • 09:07 AM

  सोलापूर - पंढरपुरात आषाढी वारीची लगभग, मात्र पोलीस प्रशासन आरक्षण आंदोलनावरून चिंतेत, मराठा समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात. पोलीस बंदोबस्त वाढ.

 • 09:03 AM

  अहमदनगर : भंडारदरा धरण ९० % पेक्षा जास्त भरले, मुळा धरण सकाळी 6 वाजता ५० टक्के भरले.

All post in लाइव न्यूज़