एक तप - 12 वर्षांनी फुलतेय नीलाकुरिंजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 08:26 PM2018-07-31T20:26:49+5:302018-08-01T17:48:44+5:30

केरळमधील मुन्नार सध्या जांभळ्या गुलाबी रंगात न्हाऊन निघालं आहे, कारण तेथे तब्बल 12 वर्षांनी नीलाकुरिंजी हे फुलं फुलताना दिसत आहे.

जांभळ्या आणि गुलाबी रंगात न्हाऊन निघालेलं हे सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालत आहे. तब्बल बार वर्षांनी मुन्नारच्या हिरव्यागार टेकड्यांवर नीलाकुरिंजीला बहर आला आहे.

केरळात आढळणारी नीलाकुरिंजी अत्यंत दुर्मिळ आहे. बारा वर्षांनी एकदाच नीलाकुरिंजीला बहार येतो. त्यानंतर ही रोपटी मरून जातात.

पर्यटकांच्या डोळ्यांचं पारणं फेडण्यासोबतच ही फुलझाडं, फुलपाखरं आणि मधमाशांसाठीही तितकीच उपयुक्त आहेत.

आशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये नीलाकुरिंजीच्या ४५० विविध प्रजाती आढळतात. त्यातल्या १४६ प्रजाती या भारतात आहेत तर तब्बल ४३ या फक्त देवभूमीत म्हणजे केरळात आढळतात.