पाकमध्ये पुन्हा तालिबानी थैमान

By admin | Published: January 21, 2016 12:00 AM2016-01-21T00:00:00+5:302016-01-21T00:00:00+5:30

अलीकडेच तालिबानच्या चार अतिरेक्यांना फासावर लटकविण्यात आले होते. त्याचा सूड घेण्यासाठी हल्ला केल्याचा दावा तालिबानने केला व हे हल्ले यापुढेही सुरूच राहतील असा इशाराही दिला.

पाकचे राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन व पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. दहशतवाद समूळ नष्ट करण्याच्या निर्धारापासून सरकार अशा हल्ल्यांमुळे हटणार नाही असे शरीफ म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध करून मृतांच्या नातेवाइकांप्रति संवेदना व्यक्त केली.

या अतिरेकी हल्ल्यानंतर विद्यापीठातील कर्मचारी आणि विद्यार्थी भेदरलेले असताना अशाही परिस्थितीत तेथील रसायनशास्त्राचे साहाय्यक प्राध्यापक सय्यद हामिद (३४) यांनी अतिरेक्यांशी दोन हात केले. मात्र विद्यार्थ्यांना वाचविताना अतिरेक्यांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.

हल्ला झाला त्या वेळी विद्यापीठात तीन हजार विद्यार्थी व चर्चासत्राला ६०० पाहुणे उपस्थित होते असे कुलगुरू डॉ. फजल रहीम यांनी सांगितले.

दोन वर्षांपूर्वी १६ डिसेंबर रोजी पेशावरमध्ये लष्करातर्फे चालविल्या जाणाऱ्या विद्यालयात असाच राक्षसी हल्ला करून १२६ निरागस विद्यार्थ्यांचे बळी घेतले होते.

लष्कराने प्रत्युत्तरादाखल कारवाई करत चारही हल्लेखोरांचा खात्मा करेपर्यंत त्यांनी वर्गखोल्या आणि वसतिगृहात शिरून केलेल्या बेछूट गोळीबाराने अंगाचा थरकाप उडविणारे रक्ताचे पाट वाहिले होते.

सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाणारे थोर स्वातंत्र्यसेनानी खान अब्दुल गफ्फार खान यांचे नाव धारण करणाऱ्या या विद्यापीठात त्यांच्या २८ व्या पुण्यतिथीनिमित्त कवितांवर परिसंवाद सुरू असताना तालिबानींनी हा राक्षसी रक्तपात केला.

वायव्य पाकिस्तानातील अशांत खैबर पख्तुनवा प्रांतात चारसद्दा येथील प्रसिद्ध बादशहा खान विद्यापीठावर तालिबानी अतिरेक्यांनी बुधवारी (२० जानेवारी २०१६) सकाळी केलेल्या अमानुष हल्ल्यात विद्यार्थी व शिक्षकांसह किमान २५ जण ठार तर ५० जण जखमी झाले.