दुष्काळाचा कलंक : ज्वारीच्या कोठारात विकला जातोय आता मराठवाड्याचा कडबा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 12:28 PM2019-03-04T12:28:14+5:302019-03-04T12:32:26+5:30

मल्लिकार्जुन देशमुखे मंगळवेढा : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशात ज्वारी व कडबा पुरवणाºया व राज्यात ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असणाºया ...

Dangerous stigma: Marathwada is now being sold in the jowar gardens! | दुष्काळाचा कलंक : ज्वारीच्या कोठारात विकला जातोय आता मराठवाड्याचा कडबा !

दुष्काळाचा कलंक : ज्वारीच्या कोठारात विकला जातोय आता मराठवाड्याचा कडबा !

Next
ठळक मुद्देमंगळवेढा शिवारात झळकू लागले ‘कडबा विकणे आहे’चे फलकमंगळवेढ्याच्या इतिहासात पहिल्यांदा हजारो हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची वेळ आली आता ‘कडबा विकणे’ आहे, असे जाहिरातीचे फलक झळकू लागले

मल्लिकार्जुन देशमुखे

मंगळवेढा : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशात ज्वारी व कडबा पुरवणाºया व राज्यात ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असणाºया मंगळवेढा तालुक्यात यंदा ज्वारीची पेरणीच झाली नसल्याने कडब्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. दरवर्षी ज्वारीच्या कोठारात कडबा घेण्यासाठी गर्दी होत होती़ यंदा उत्पादन कमी झाले असले तरी ज्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडून घेऊन विकण्यासाठी शिवारात आता ‘कडबा विकणे’ आहे, असे जाहिरातीचे फलक झळकू लागले आहेत.

काळी कसदार व सुपीक जमीन असल्याने तालुक्यात बोराळे, मुंढेवाडी, मंगळवेढा शिवार ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे. ओल टिकवून ठेवणाºया जमिनी मंगळवेढा शिवारात असल्याने एकदा पेरले की ज्वारी काढायलाच शेतकरी जातो, मात्र यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने ज्वारीची पेरणी झाली नाही़ मंगळवेढा रब्बीचा तालुका म्हणून ओळखला जातो़ तालुक्यात रब्बीचे ५४ हजार हेक्टर क्षेत्र आहे़ यापैकी १५ हजार २५७ हे. म्हणजे केवळ २८ टक्के इतकी पेरणी झाली आहे़ पुरेशा पावसाअभावी पेरणी केलेल्या क्षेत्रावरील ज्वारी जळून गेली आहे़ जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे बहुतांश शेतकºयांनी यावर्षी पेरणी केली नाही़ त्यामुळे जवळपास ३९ हजार हेक्टर क्षेत्र नापेर राहिले.

तालुक्यात खरीप व रब्बी हंगामात केवळ ३७ टक्के इतका पाऊस झाला. खरिपात १८ हजार ६४४ हेक्टरवर पेरणी झाली. परंतु पावसाअभावी खरीप पिके जळून गेली. यावर्षी ज्यांनी पेरले त्यांच्या हाती बाटूक पण आले नाही़ ज्वारीचे उत्पादन घटल्याने कडबा मिळणेही दुरापास्त आहे़ तालुक्यातील पशुपालक इतर तालुक्यात फिरून कडबा विकत घेत आहेत.

सध्या तालुक्यातील चार कारखान्यांनी उसाचे संपूर्ण क्षेत्र गाळप केले आहे़ चारा मिळणे मुश्कील झाले आहे़ येथील चाºयाचे दर गगनाला भिडले आहेत़ त्यामुळे जनावरे सांभाळायची कशी? असा प्रश्न दूध पालकांना सतावत आहे़  कडब्याची एक पेंडी २५ ते ३० रुपयांना मिळत आहे़ ऊस प्रति टन ३ ते ४ हजार रुपये असा झाला आहे.

शेतकºयांची कडब्याची वाढती मागणी पाहता उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर, तुळजापूर या भागातील व्यापाºयांनी कडबा विकणे आहे, संपर्क करा, अशा जाहिराती मंगळवेढ्यामध्ये जागोजागी लावल्या आहेत.

मंगळवेढ्याच्या इतिहासात पहिल्यांदा हजारो हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची वेळ आली आहे़ त्यामुळे कडबा व ज्वारीला उच्चांकी दर मिळत आहे़

तालुक्यातील पशुधनाचे हाल
- तालुक्यातील शेतकरीशेतीला पूरक म्हणून दुग्धव्यवसाय करीत आहेत़ तालुक्यात सध्या गायी-म्हशींची संख्या ९५ हजार असून, शेळ्या-मेंढ्यांची संख्या ७६ हजार इतकी व कोंबड्यांची संख्या १ लाख ५७ हजार इतकी आहे़ या जनावरांना शासन पाण्यासाठी टँकर न देता पाण्यापासून वंचित ठेवल्याने पशुधनाचे मोठे हाल होत आहेत़ खरीप व रब्बी हंगाम कोरडा गेल्याने तालुक्यात चाºयाचे उत्पादन काहीच न झाल्यामुळे तीव्र चाराटंचाई जाणवत आहे़

Web Title: Dangerous stigma: Marathwada is now being sold in the jowar gardens!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.