Sindhudurg District Bank Election: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर कोणाचे वर्चस्व?; आज होणार मतमोजणी, संपूर्ण राज्याचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 09:19 AM2021-12-31T09:19:56+5:302021-12-31T09:29:42+5:30

Sindhudurg District Bank Election: केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उडी घेऊन राणेंचा पराभव करण्यासाठी रणनिती आखली आहे.

Sindhudurg District Bank Election Result Narayan rane, Nitesh rane vs Mahavikas aghadi | Sindhudurg District Bank Election: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर कोणाचे वर्चस्व?; आज होणार मतमोजणी, संपूर्ण राज्याचं लक्ष

Sindhudurg District Bank Election: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर कोणाचे वर्चस्व?; आज होणार मतमोजणी, संपूर्ण राज्याचं लक्ष

googlenewsNext

सिंधुदुर्ग - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा बँकेसाठी गुरूवारी ९८ टक्के मतदान झाले. आता थोड्याच वेळात सिंधुदुर्ग नगरीतील शिक्षक पतपेढीच्या सभागृहात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उडी घेऊन राणेंचा पराभव करण्यासाठी रणनिती आखली आहे. आज दुपारपर्यंत बॅंकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हातात असणार हे स्पष्ट होणार आहे.

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय संतोष परब यांच्यावर खूनी हल्ला झाल्यानंतर या प्रकरणात नितेश राणे यांचे नाव आल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र कालच तो न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणामुळे जिल्हा बँक निवडणूक खूपच गाजली. नितेश राणे यांच्या अनुपस्थितीत भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीला यश मिळणार की सतीश सावंत महाविकास आघाडीच्या रूपाने वर्चस्व अबाधित ठेवणार हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी सिंधुदुर्गनगरीत कडेकोट बंदोबस्त ठेवला असून दोन्ही बाजूंच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना कालच प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
 

Web Title: Sindhudurg District Bank Election Result Narayan rane, Nitesh rane vs Mahavikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.