सांगली : दोडक्याच्या निकृष्ट बियाणामुळे शेतकचे लाखोचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 05:10 PM2018-03-09T17:10:47+5:302018-03-09T17:10:47+5:30

मिरज तालुक्यातील आरग, बेडग परिसरातील पाच शेतकऱ्यांना दोडक्याचे बियाणे निकृष्ट दर्जाचे मिळाल्यामुळे निम्म्या बिया उगविल्या नाहीत, तर उर्वरित बिया उगवल्या आहेत. पण, त्याला कळ्या लागण्यापूर्वीच वाळू लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मशागत, खताचे लाखो रुपये वाया गेले आहे. शेतकऱ्यांनी कंपनी आणि मिरज पंचायत समितीमधील कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुनही त्यांच्याकडून दखल घेतली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

Sangli: The loss of millions of farmers due to crop failure due to drought | सांगली : दोडक्याच्या निकृष्ट बियाणामुळे शेतकचे लाखोचे नुकसान

सांगली : दोडक्याच्या निकृष्ट बियाणामुळे शेतकचे लाखोचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देदोडक्याच्या निकृष्ट बियाणामुळे शेतकचे लाखोचे नुकसान आरग परिसरातील कृषी सेवा केंद्र चालकाकडे तक्रार

सांगली : मिरज तालुक्यातील आरग, बेडग परिसरातील पाच शेतकऱ्यांना दोडक्याचे बियाणे निकृष्ट दर्जाचे मिळाल्यामुळे निम्म्या बिया उगविल्या नाहीत, तर उर्वरित बिया उगवल्या आहेत. पण, त्याला कळ्या लागण्यापूर्वीच वाळू लागले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मशागत, खताचे लाखो रुपये वाया गेले आहे. शेतकऱ्यांनी कंपनी आणि मिरज पंचायत समितीमधील कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुनही त्यांच्याकडून दखल घेतली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

बेडग येथील मल्हारी ओमासे, आरगमधील महादेव निकम, हिंमत इंगळे, महादेव इंगळे, कृष्णा गावडे या शेतकऱ्यांनी व्ही.एन.आर. या कंपनीचे दोडका बियाणाची ११ डिसेंबर २०१७ मध्ये टोकण केली होती. काही बियाणाची उगवणच झाली नाही. याबद्दल शेतकऱ्यांनी आरग परिसरातील कृषी सेवा केंद्र चालकाकडे तक्रार केली.

यावेळी संबंधीत दुकानदाराने थोडे दिवस थांबा बियाणाची उगवण होईल, असे आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी कुठेही तक्रार केली नाही. जानेवारी महिना संपला तरीही बियाणाची उगवणच झाली नाही. तसेच उगवले पिकही रोग पडून वाळू लागले. औषध फवारणी करुनही पिक वाळूच लागल्यामुळे शेतकऱ्यांनी मिरज पंचायत समितीकडे दि. ७ फेब्रुवारी २०१८ रोजी तक्रार केली.

तक्रारीनंतर मल्हारी ओमासे यांच्या शेताला भेट देवून कृषी अधिकाऱ्यांनी पहाणी केली. पण, या पहाणीचा आम्हाला अहवालच दिला नाही. पंचनाम्यावर आमच्या सह्याही घेतल्या नाहीत, असा आरोपही ओमासे यांनी केला. २०० ग्रॅम दोडका बियाणे तपासणीसाठी पाठविण्याची अधिकाऱ्यांकडे विनंती करुनही त्यांनी ते नमुने तपासणीसाठी पाठविले नाहीत.

Web Title: Sangli: The loss of millions of farmers due to crop failure due to drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.