अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 07:16 AM2024-04-30T07:16:12+5:302024-04-30T07:16:53+5:30

जंगम मालमत्तेत मात्र २ कोटी ८५ लाख ७१ हजार ०९० रुपयांची वाढ झाली आहे. अनिल देसाई आणि त्यांच्या पत्नीकडे मात्र कोणतेही वाहन नाही.

lok sabha election 2024 shiv sena leader Anil Desai's assets increase by Rs 53 crore | अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही

अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही

मुंबई : मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी आपल्याकडील मालमत्तेचे विवरणपत्र सादर केले. उद्धवसेनेचे राज्यसभेचे खासदार असलेले देसाई यांच्या स्थावर मालमत्तेत गेल्या सहा वर्षांत कोणतीही वाढ झाली नाही. जंगम मालमत्तेत मात्र २ कोटी ८५ लाख ७१ हजार ०९० रुपयांची वाढ झाली आहे. अनिल देसाई आणि त्यांच्या पत्नीकडे मात्र कोणतेही वाहन नाही.

अनिल देसाई

              २०१८ (राज्यसभा) २०२४ (लोकसभा)

 स्थावर मालमत्ता        ६,००,००,०००     ६,००,००,०००

जंगम मालमत्ता १,००,००,२३३     ३,८५,७१,३२३

कर्ज    ८९,००,०००      ७६,००,००

दागिने  १५,०१,०००      ३६,८९,८००

बँकांतील ठेवी    ८०,८०,२३३      ३,०६,०२,६९२

बाँड / शेअर     १९,०००  ३९,५१,९३४

रोकड   ३,००,०००       ७५,०००

घर   २०१८ : अनिल देसाई, त्यांच्या पत्नी आणि मुलगी यांच्या एकत्रित नावावर ब्रीचकँडी येथे पीकॉक पॅलेसमध्ये २२२८.४० चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळाचा फ्लॅट. एकत्रित एकूण किंमत १४ कोटी ८२ लाख रु. तेव्हाचे बाजारमुल्य.

२०२४ : देसाई, त्यांच्या पत्नी, मुलगी यांच्या एकत्रित नावावर ब्रीचकँडी येथे पीकॉक पॅलेसमध्ये २२२८.४० चौरस फूटाचा फ्लॅट आहे. त्यात देसाई व पत्नी यांची ४०%, तर मुलीची २०% मालकी आहे. एकत्रित किंमत १५ लाख.

पत्नी प्रीती देसाई

              २०१८ (राज्यसभा)        २०२४ (लोकसभा)

स्थावर मालमत्ता ८,८२,००,०००     १०,११,८३,०८२

जंगम मालमत्ता १,७०,३५,४८३     २,९६,८९,३२६

कर्ज    २,०१,६८,६९४     १,५४,३६,२१२

दागिने  ६४,२७,०००      १,५७,१८,०००

बाँड / शेअर     ५२,०२,६६६      १७,४००

बँकांतील ठेवी    ३५,५५,८१७      १,३१,६२,२५८

रोकड   २,००,०००       १,००,०००

घर   २०१८ : प्रीती, पती अनिल, मुलगी यांच्या मालकीचे ब्रीचकँडी येथे घर. अहमदाबाद येथे ५ हजार चौरस फुटांचा भूखंड, २०१८ मध्ये त्याचे बाजारमूल्य ७ लाख रुपये होते.

२०२४ : मुलगी आणि जावई यांच्या एकत्रित मालकीत नेपियन्सी रोडला ९१२ चौरस फुटांचे घर, त्यात प्रीती यांची ५५% मालकी. यातील प्रीती यांच्या मालकीच्या हिश्शाची रक्कम ३,२२,५३,००० रुपये. पुण्यातील खराडी येथे १२०० चौरस फुटांचा फ्लॅट, त्याची किंमत ८२ लाख रुपये आहे.

Web Title: lok sabha election 2024 shiv sena leader Anil Desai's assets increase by Rs 53 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.