भेंडी, दोडका, मटारच्या भावात वाढ

By Admin | Published: September 14, 2015 04:32 AM2015-09-14T04:32:22+5:302015-09-14T04:32:22+5:30

मागील तीन दिवस जोरदार पाऊस होऊनही बाजारात भाजीपाल्याची चांगली आवक झाली. त्यामुळे काही भाज्या वगळता बहुतेक भाज्यांचे भाव स्थिर राहिले

Increase in the price of okra, dodka, peas | भेंडी, दोडका, मटारच्या भावात वाढ

भेंडी, दोडका, मटारच्या भावात वाढ

googlenewsNext

पुणे : मागील तीन दिवस जोरदार पाऊस होऊनही बाजारात भाजीपाल्याची चांगली आवक झाली. त्यामुळे काही भाज्या वगळता बहुतेक भाज्यांचे भाव स्थिर राहिले. भेंडी, दोडका, घेवडा व मटारच्या भावातही वाढ झाली असून, कारली, पापडी, आर्वी, ढेमसे व गाजराचे भाव घटले आहेत. पालेभाज्या काही प्रमाणात महागल्या आहेत. रविवारी बाजारात हरितालिका व ऋषिपंचमीमुळे रताळ्याची आवक झाली.
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी १५० ते १६० ट्रक शेतमालाची आवक झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक १० ते १५ गाड्यांनी कमी आहे. शनिवारी बैलपोळा असल्याने काही शेतकऱ्यांनी तोडणी केली नाही. त्यामुळे स्थानिक भागातून आवक काहीशी घटल्याचे व्यापारी विलास भुजबळ यांनी सांगितले. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेल्या पावसाचा परिणाम रविवारी बाजारावर जाणवला नाही. त्यामुळे काही भाज्या वगळता बहुतेक भाज्यांचे भाव स्थिर राहिले. भेंडी व दोडक्याचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत प्रतिदहा किलोमागे प्रत्येकी ६० रुपयांनी वाढले, तर मटार व घेवड्याच्या भावात सुमारे १०० रुपयांची वाढ झाली. कारल्याच्या भावात ७० रुपयांची, पापडीच्या भावात ४० रुपयांची, तर गाजराच्या भावात ८० रुपयांची घट झाली.
येत्या बुधवारी हरितालिका, तर शुक्रवारी ऋषिपंचमी असल्याने रविवारी बाजारात कराड व कर्नाटकमधून रताळ््याची आवक झाली. आवक काहीशी कमी झाल्याने रताळ््याला चांगला भाव मिळाला.
मागील आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांचे भाव वाढले आहेत. कोथिंबिरीच्या भावात शेकडा जुडीमागे ६०० रुपयांनी, तर मेथी, कांदापात व मुळ््याचे भाव प्रत्येकी २०० रुपयांनी वाढले. पालकच्या भावातही ३०० रुपयांची वाढ झाली आहे. या भाज्यांना पावसाचा फटका बसला आहे. बाजारात स्थानिक भागातून ९० हजार जुडी, तर गुजरातमधून ४ टेम्पो कोंथिबिरीची आवक झाली, तर स्थानिक भागातून ५० हजार जुडी मेथीची आवक झाली.
मार्केट यार्डात रविवारी झालेल्या आवकमध्ये कर्नाटकातून ४ ते ५ ट्रक कोबी, कर्नाटक व मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून ५ ते ६ टेम्पो शेवगा, तर कर्नाटकातून २ ते ३ टेम्पो भुईमूग शेंगची आवक झाली. इंदोर व आग्रा येथून ५० ते ५५ ट्रक बटाटा आणि मध्य प्रदेशातून ३ ते ३.२ हजार गोणी लसणाची आवक झाली.
स्थानिक भागातून ४५० ते ५०० गोणी सातारी आले, ५.५ ते ६ हजार पेटी टोमॅटो, १५ ते १६ टेम्पो फ्लॉवर, १५ ते १६ टेम्पो कोबी, १० ते १२ टेम्पो ढोबळी मिरची, ३ ते ४ टेम्पो शेवगा, ४ ते ५ टेम्पो गाजर, ३ ते ४ टेम्पो मटार, ५ ते ६ टेम्पो पावटा, कराड व कर्नाटकातून ४ ते ५ ट्रक रताळी, तर १० ते १२ टेम्पो तांबडा भोपळ््याची आवक झाली.
फुलांचे प्रतिकिलो भाव : झेंडू १०-३०, गुलछडी ८०-१३०, बिजली २०-४०, कापरी ५-२०, सुट्टा कागडा १५०-२००, जुई १५०-२००, (चार गड्डीचे भाव) आॅस्टर ३-५, (बारा नगाचे भाव) गुलाबगड्डी १०-२०, ग्लॅडिएटर १०-२०, गुलछडी काडी १०-४०, डच गुलाब (२० नग) ३०-६०, लिलीबंडल (५० काडी) ५-१०, अबोली लड ३०-४०, जर्बेरा २०-३०, कार्नेशियन ४०-८०.
फळभाज्यांचे १० किलोचे भाव : कांदा : जुना ४००-४५०, नवा ४००-४८०, इजिप्त ४२०-४५०, बटाटा ६०-११०, लसूण : ४००-८००, आले : सातारी : २००-३२०, बंगलोर २००-२२०, भेंडी : १५०-२२०, गवार : गावरान ३००-४००, सुरती २५०-३००, टोमॅटो : ५०-८०, दोडका : १४०-१६०, हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : ४०-८०, चवळी : १४०-१६०, काकडी : १२०-१५०, कारली : हिरवी : ७०-८०, पांढरी : ४०-५०, पापडी : १६०-१८०, पडवळ : १४०-१६०, फ्लॉवर : ४०-८०, कोबी : ४०-१००, वांगी : ८०-१२०, डिंगरी : १४०-१६०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ८०-१००, तोंडली : कळी : १५०-१६०, जाड : ७०-८०, शेवगा : २५०-३००, गाजर : १५०-२००, वालवर : २२०-२४०, बीट : ५०-६०, घेवडा : २००-३००, कोहळा : १५०-२००, आर्वी : १५०-२००, घोसावळे : १४०-१५०, ढेमसे : १४०-१५०, भुईमुग शेंग ४००-५००, मटार : स्थानिक ७००-८००, पावटा : १५०-२००, तांबडा भोपळा : ४०-८०, सुरण २२०-२३०, नारळ : १०००-१२००, मका कणीस (शेकडा) : २००-३००.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर ५००-१६००, मेथी ८००-१२००, शेपू ४००-६००, कांदापात ५००-१०००, चाकवत ५००-६००, करडई ४००-५००, पुदिना २००-४००, अंबाडी ४००-५००, मुळे ५००-८००, राजगिरा ४००-६००, चुका ३००-५००, चवळई ४००-६००, पालक ५००-८००.
फळांचे भाव : लिंबे (गोणीस) : २००-९००, मोसंबी : (३ डझन) : १२०-२५०, (४ डझन ): ५०-१२०, संत्रा (३ डझन) १२०-३००, (४ डझन) ५०-१२०, (प्रतिकिलोस) डाळिंब : भगवा : ३०-१३०, गणेश २०-६०, आरक्ता २०-७०, पपई ३-१५, कलिंगड ५-१५, खरबूज १०-३५, चिकू (१० किलो) १५०-५००, पेरू (२० किलो) ३५०-४००, सफरचंद : काश्मीर डेलिशियस (१५ किलो) ११००-१२००, सिमला (२० ते ३० किलो) ९००-१७००, गोल्डन (२० ते २५ किलो) १२००-१५००, पिअर (१५ किलो) ६००-१०००, बटरनाक (१७ ते १८ किलो) ८०० ते १०००.
(प्रतिनिधी)

Web Title: Increase in the price of okra, dodka, peas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.