Pune: धरणात पोहण्याचा मोह जिवावर बेतला! प्रवरा मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 11:47 AM2024-01-27T11:47:25+5:302024-01-27T11:48:01+5:30

१५ वर्गमित्र पर्यटनासाठी मावळ तालुक्यातील पवनाधरणाच्या परिसरात आले होते...

temptation to swim in the dam is dying! Student of Pravara Medical College drowned in water | Pune: धरणात पोहण्याचा मोह जिवावर बेतला! प्रवरा मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

Pune: धरणात पोहण्याचा मोह जिवावर बेतला! प्रवरा मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू

पवनानगर (पुणे) :  मावळ तालुक्यातील पवनाधरण परिसरातील ठाकुरसाई गावाच्या हद्दीमध्ये टेंट परिसरात पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. तो अहमदनगर जिल्ह्यातील लोणी प्रवारा कॉलेजमधील मेडिकलमध्ये शिक्षण घेत होता. १५ वर्गमित्र पर्यटनासाठी मावळ तालुक्यातील पवनाधरणाच्या परिसरात आले होते. मनिष शंकर शर्मा (वय.२० रा.मुंबई) असे त्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती.

चार विद्यार्थी पवनाधरणात भिजण्याचा आंनद घेण्यासाठी ४ वर्गमित्र पाण्यात गेले असता पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने त्यामधील दोन विद्यार्थी पाण्यात बुडत असताना सोबत असलेल्या इतर मित्रांनी आरडाओरडा केल्याने स्थानिकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आदित्य सचिन बुंदले (वय. २०) याला वाचविण्यात यश आहे. याबाबत सविस्तर माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस चौकशी सुरू आहे. 

सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर त्याठिकाणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस दाखल झाले. शिवदुर्ग मित्र मंडळ रेस्क्यू टिमच्या माध्यमातून पाण्यातून मृतदेह बाहेर काढला आहे. यावेळी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय गाले, अमोल गवारे, जय पवार, भिमराव वांळुज यांच्यासह स्थानिकांच्या मदतीने मृतदेह साडेसातच्या सुमारास बाहेर काढला आहे. त्यानंतर श्छेवदानासाठी तळेगाव येथे नेण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस तपास जय पवार करत आहेत.

Web Title: temptation to swim in the dam is dying! Student of Pravara Medical College drowned in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.