खुशखबर..! उजनीत चोवीस तासांत सात टीएमसी पाणी जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 08:00 PM2019-07-31T20:00:30+5:302019-07-31T20:02:53+5:30

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेले उजनी धरण हे तब्बल ११७ टीएमसीचे आहे.

Seven TMC water collected in twenty-four hours at Ujani dam | खुशखबर..! उजनीत चोवीस तासांत सात टीएमसी पाणी जमा

खुशखबर..! उजनीत चोवीस तासांत सात टीएमसी पाणी जमा

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात दमदार पाऊस : खडकवासला साखळीत २३.८५ टीएमसी साठा 

पुणे : जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असून, सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे उजनी धरणातीलपाणीसाठ्यात वेगाने वाढ  होत आहे. बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत धरणात ७.१६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमाझाला होता. तर, खडकवासला साखळीतील चारही धरणात मिळून २३.८५ टीएमसी (८१.८३ टक्के) पाणी जमा झाले आहे. 
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेले उजनी धरण हे तब्बल ११७ टीएमसीचे आहे. त्यापैकी ६३.६५ टीएमसी मृत व ५३.५७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. जून महिन्याच्या सुरुवातीस धरणांत खडखडाट होता. पावसाने ओढ दिल्याने यंदा उजनी धरण उपयुक्त साठ्यामधे येते की नाही, अशी शंका व्यक्त होत होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात कुकडी आणि भीमा खोºयात दमदार पाऊस झाला. त्या नंतर पुन्हा पावसाने दडी मारली. गेले चार-पाच दिवस धरण क्षेत्रात पावसाचा चांगला जोर आहे. त्यामुळे,जिल्ह्यातील धरणात साठ ते शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. 
बुधवारी दिवसभर जिल्ह्यातील बहुतांश धरणात पावसाचा जोर कमी होता. वडज धरणातून २ हजार ३६६ क्युसेक वेगाने सोडण्यात येणारे पाणी सायंकाळी १२२० क्युसेक पर्यंत खाली आणले. चासकमान भरण्याच्या मार्गावर असल्याने सायंकाळी ३६८५ क्युसेक वेगाने पाणी नदीत सोडण्यात येत होते. वडीवळे १२५६, आंद्रा २०४५, कासारसाई धरणातून २०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. खडकवासला धरणातून सकाळी ९,४१६ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. बुधवारी दिवसभर पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासल्यातील विसर्ग २,५६८ क्युसेकपर्यंत खाली आणला. वीर धरणात पाण्याची आवक वाढल्याने येथून सायंकाळी तब्बल २२ हजार ६८० क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात येत होते. 
जिल्ह्यातील धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत असल्याने उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होत आहे. उजनीत मंगळवारी सकाळी उणे ०.९७ टीएमसी साठा होता. सायंकळापर्यंत धरणातील उपयुक्त साठ्यात वाढ होऊ लागली. बुधवारी सकाळी आठपर्यंत उजनीत ४.०८ टीएमसी पाणीसाठा झाला. सायंकाळी साडेपाच पर्यंत त्यात ७.१६ टीएमसी पाणीसाठा झाला. 
---
खडकवासला साखळीत जोरदार पाऊस
खडकवासला साखळीतील टेमघर धरणात बुधवारी सकाळी आठ पर्यंत ९०, वरसगाव ८०, पानशेत ७८ आणि खडकवासला येथे ४० मिलिमीटर पाऊस झाला. बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत टेमघर २०, वरसगाव ७० आणि पानशेतला ७७ मिलिमीटर पाऊस झाला. खडकवासला धरण क्षेत्रात ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला धरणात १.९७, पानशेत ९.७१, वरसगाव ९.६९ आणि टेमघर धरणात २.४१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या चारही धरणात मिळून २३.८५ टीएमसी पाणी (८१.८३ टक्के) जमा झाले आहे.  

Web Title: Seven TMC water collected in twenty-four hours at Ujani dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.