सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 03:40 PM2024-05-15T15:40:18+5:302024-05-15T15:41:52+5:30

Vijay Wadettiwar, PM Modi road show at Ghatkopar Mumbai: दुर्दैवी घटना घडल्यानंतर भाजपने रॅली रद्द करायला हवी होती. पण भाजपाला रॅली काढून आनंद मिळताना दिसतोय, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली

Vijay Wadettiwar slams PM Modi Road Show organized in Ghatkopar where hoarding collapsed and 16 died | सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल

सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल

Vijay Wadettiwar, PM Modi road show at Ghatkopar Mumbai: मुंबईच्या घाटकोपर भागात होर्डिंग दुर्घटना घडली. भ्रष्ट महायुतीमुळे या दुर्घटनेत अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. तरी देखील भाजपाच्या रॅली, रोड शो थांबत नाहीत. सत्तापिपासू भाजपाचा संवेदनशीलपणा संपला आहे. दुर्दैवी घटना घडल्यानंतर भाजपने रॅली रद्द करायला हवी होती. पण भाजपाला रॅली काढून आनंद मिळताना दिसतोय. होर्डिंग दुर्घटना स्थळाजवळून पंतप्रधानांची रॅली भाजपा काढत आहे. भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय का? असा संतप्त सवाल  विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

"आज मुंबईत मोदींचा रोड शो होतोय आणि राज्यात २४ वी सभा घेतली जात आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा एखादा नेता एवढ्या सभा घेत नाही, तेवढ्या सभा या राज्यात मोदी घेत आहेत. याचा अर्थ असा आहे की, राहुल गांधी यांची मोदींना भिती वाटते. महाविकास आघाडी 35 जागा जिंकणार आहेत. त्यामुळे भाजपा घाबरली आहे. नाशिकमध्ये पंतप्रधानांनी सभा घेतली पण कांदा प्रश्नावर ब्र सुद्धा काढला नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची या राज्यात पिळवणूक केली जात आहे. ही वस्तुस्थिती आहे," अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान!

"सध्या मोदींची तळी उचलण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधानांच्या डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप घातला. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. हा जिरेटोप फक्त शिवाजी महाराजांच्या डोक्यावर शोभतो. महाराष्ट्रच्या अस्मितेची जाण पटेलांना नसावी म्हणून हे कृत्य केले आहे. प्रफुल पटेल यांचे दहशवाद्यांशी संबंध होते, असे भाजपाने आरोप केले होते. त्यांच्या मागे ईडी लावली. तरीदेखील त्यांच्या हातून जिरेटोप कसा परिधान केला? तसेच आता जिरेटोप घातल्यानंतर प्रफुल पटेल माफी मागणार आहेत का? कारण फक्त ट्वीट करून तुमचा उद्देश सफल होणार नाही," असा टोला वडेट्टीवार प्रफुल्ल पटेलांना लगावला.

होर्डिंग दुर्घटनेला मुंबई महापालिका आणि सरकार जबाबदार आहे. जी क्रेन घटनास्थळी लवकर जायला हवी होती ती काल गेली. आता महायुतीचे पाप लपविण्यासाठी भावेश भिंडे नावाच्या व्यक्तीचे फोटो समोर आणले आहेत. कोणाचेही फोटो कोणासोबत असू शकतात. त्यामुळे काही फरक पडणार नाही. प्रतिमा मलिन करण्याचा भाजपाचा जुना डाव आहे. पण जनता आता भाजपाला ओळखून आहे. या सगळ्या घटनेची उचस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली असल्याची माहितीही वडेट्टीवारांनी दिली.

Web Title: Vijay Wadettiwar slams PM Modi Road Show organized in Ghatkopar where hoarding collapsed and 16 died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.