गुढीपाडव्याला देवदर्शन करून परतणाऱ्यांवर काळाचा घाला; पुणे - नगर महामार्गावरील अपघातात शिरूरच्या चौघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 11:58 AM2023-03-23T11:58:39+5:302023-03-23T11:58:45+5:30

शिरूरच्या आमदाबाद येथील चौघांचा मृत्यू तर सात जण गंभीर जखमी

Put a curse on those who return from Goddarshan at Gudipadwa; Accident on Pune-Nagar Highway, 4 killed in Shirur | गुढीपाडव्याला देवदर्शन करून परतणाऱ्यांवर काळाचा घाला; पुणे - नगर महामार्गावरील अपघातात शिरूरच्या चौघांचा मृत्यू

गुढीपाडव्याला देवदर्शन करून परतणाऱ्यांवर काळाचा घाला; पुणे - नगर महामार्गावरील अपघातात शिरूरच्या चौघांचा मृत्यू

googlenewsNext

टाकळी हाजी : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवदर्शन करूण परतलेल्या आमदाबाद (ता.शिरूर) येथील भाविकांचा अपघात झाल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आमदाबाद गावावर शोककळा पसरली आहे .

आमदाबाद ता शिरूर  येथील भाविक बुधवारी ( दि.२२) देवदर्शनासाठी देवगड व शनी शिंगणापूर येथे गेले होते.देवदर्शन करून परतत असताना रात्री सव्वा बाराच्या सुमारास पुणे -नगर महामार्गावर सुपे ते कामरंगाव च्या दरम्यान चौधरी ढाब्याजवळ कंटेनर आणि ट्रक चा भीषण अपघात झाला. यावेळी कंटेनर भाविकांच्या गाडीवर आदळला असून कंटेनरचा टायर फुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

अपघातात आमदाबाद येथील राजेंद्र विष्णू साळवे (वय ३३ वर्ष), विजय राजेंद्र अवचिते (वय २६ वर्षे), धीरज मोहिते (वय १० वर्षे), मयुर संतोष साळवे ( वय २५ वर्षे), यांचा मुत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर अ.नगर येथील पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे आमदाबाद गावावर शोककळा पसरली आहे. गावातील प्रमुखांनी नगरकडे धाव घेतली आहे. अपघात जखमी झालेल्यांवर उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे माजी चेअरमन अशोक माशेरे यांनी सांगितले.

Web Title: Put a curse on those who return from Goddarshan at Gudipadwa; Accident on Pune-Nagar Highway, 4 killed in Shirur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.