VIDEO : भरधाव फॉर्च्युनर कार हॉटेलात घुसली ; एक ठार आणि दोघे जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 03:53 PM2018-04-30T15:53:24+5:302018-04-30T19:47:20+5:30

फॉर्च्युनर कारवरील वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली.

high speedly Fortune car entered in the hotel; One killed and two injured | VIDEO : भरधाव फॉर्च्युनर कार हॉटेलात घुसली ; एक ठार आणि दोघे जखमी 

VIDEO : भरधाव फॉर्च्युनर कार हॉटेलात घुसली ; एक ठार आणि दोघे जखमी 

googlenewsNext
ठळक मुद्देही घटना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सांगवी येथील फेमस चौकात घडली.

पिंपरी : भरधाव वेगाने धावणारी फॉर्च्युनर कार हॉटेलमध्ये घुसल्याने मोठा अपघात घडला आहे. यात एक हॉटेल कामगार जागीच ठार झाला असून दोघे जण जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सांगवी येथील फेमस चौकात घडली. ओमप्रकाश अंबादास पंदीलवार (वय ६०)  असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे.  तर अनंत अविनाश पंदीलवार (वय १०), सुवर्णा ओमप्रकाश पंदीलवार (वय ५०) हे जखमी झाले आहेत. चालक सचिन जाधवसुद्धा जखमी झाला आहे. शिवाय कामगार बसवराज तळपदे ( वय ५० ) हासुद्धा या दुर्घटनेत जखमी झाला आहे. 
जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. वाहनचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. फॉर्च्युनर कार थेट हॉटेलमध्ये घुसल्याने ही दुर्घटना घडली. 



 

Web Title: high speedly Fortune car entered in the hotel; One killed and two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.