'या' बर्फाळ रस्त्यावर फेटफटका मारण्याचा आनंद काही औरच!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 05:02 PM2019-03-05T17:02:57+5:302019-03-05T17:32:50+5:30

जपान हा देश बुलेट ट्रेनसाठी जगप्रसिद्ध आहे. जपानच्या टोकियोपासून काही अंतरावर असा एक बर्फाच्छादित प्रदेश आहे. त्याठिकाणी मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी होते. Tateyama Kurobe Alpine Route या नावाचा लांब रस्ता असून हा रस्ता अत्यंत सुंदर आहे. या बर्फवृष्टीमुळे या रस्त्यावर बर्फाची चादर पसरते. याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक या रस्त्यावरुन फेरफटका मारताना दिसतात.

Toyama आणि Nagano प्रांतातून जाणारा हा बर्फाच्छादित रस्ता असून Roof of Japan चा हा एक भाग आहे. देशी-विदेशी पर्यटक स्नो-फॉल अनुभवण्यासाठी येत असतात.

वर्षभरातून फक्त काही महिन्यांपुरताच Tateyama Kurobe Alpine Route हा रस्ता पर्यटकांसाठी खुला करण्यात येतो. इतरवेळी हा रस्ता बंद असतो. येथील सौंदर्य पर्यटकांना भुरळ पाडतं.

बर्फाने आच्छादलेल्या या रस्त्यावर पर्यटक एक तास फिरू शकतात. बसच्या मदतीने पर्यटक या ठिकाणी पोहचू शकतात.

Tateyama Kurobe Alpine Route वर पर्यटकांना रस्ता तयार करण्यासाठी जपानच्या विशेष Snowplow Trucks चा वापर केला जातो. हे ट्रक खासकडून यासाठीच तयार करण्यात आले आहेत.

जपानमध्ये बर्फवृष्टी होणारी अनेक लोकप्रिय ठिकाणं आहेत. जपानच्या उत्तरेला Aomori हे सुंदर शहर आहे. येथील रस्त्यावर पडणारा बर्फ हटविण्यासाठी प्रशासनाला जवळपास 30 मिलियन डॉलर खर्च येतो.

बर्फवृष्टीमुळे येथे अप्रतिम वंडरलँड तयार होते. हे वंडरलँड पाहण्यासाठी पर्यटक येत असतात. स्नो फॉलची मजा अनुभवायची असेल तर जपानमधील Tateyama Kurobe Alpine Route हा उत्तम पर्याय आहे.