एक्सप्रेसचा लक्झरी ब्रँड, 'तेजस'ची खास सफर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 02:57 PM2019-10-10T14:57:32+5:302019-10-10T15:16:41+5:30

लखनौ येथून दिल्लीला जाणारी तेजस एक्सप्रेस शुक्रवारी 11.03 वाजता कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानकावर पोहचली.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिरवा झेंडा दाखवून या एक्सप्रेसचा शुभारंभ केला. आयआरटीसीकडून या खासगी रेल्वेचं नियोजन करण्यात येतंय.

या रेल्वेतील लक्झरीयस आणि आरामदायी प्रवासामुळे तेजस एक्सप्रेस चर्चेचा विषय ठरली आहे. 160 किमी प्रतीतास वेगाने ही रेल्वे धावते. रेल्वेच्या प्रत्येक सीटवरील पाठिमागील बाजूस एलईडीची व्यवस्था आहे.

या सीटवरील प्रवाशांना गाणे ऐकणे, चित्रपट पाहणे किंवा गेम खेळण्याची मनोरंजनात्मक व्यवस्था आहे. विशेष म्हणजे प्रवाशांना इअरफोनही देण्यात आले आहेत.

या ट्रेनमध्ये वायफायसह कॅटरिंगचे मेन्यू नामांकित शेफद्वारे तयार केले जातात. शताब्दी एक्सप्रेसच्या तुलनेत याचे तिकीट भाडे अधिक आहे.

तेजस एक्सप्रेसमध्ये विमानातील प्रवाशांना मिळतात, तशाच सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

तेजस एक्सप्रेसची सेवा 6 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आली आहे. पहिला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेकडून जेवण आणि गिफ्टही देण्यात आलं.