भारतीय पर्यटकांसाठी सिंगापूरच्या पायघड्या, सोयी-सुविधाही उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 09:22 AM2024-03-26T09:22:30+5:302024-03-26T09:35:22+5:30

भारतीयांचे सिंगापूरचे आकर्षण वाढले आहे.

सिंगापूर : कोरोनाच्या लॉकडाऊननंतर येथे येणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येमध्ये घट झाली होती. त्यामध्ये हळूहळू वाढ होऊ लागली आहे.

भारतीय पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी सिंगापूर पर्यटन मंत्रालयाने भारतीय पर्यटकांसमोर पायघड्या घातल्या आहेत.

येथील हॉटेलमधील रूमची संख्या वाढविण्यात येणार असून अन्य काही सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लॉकडाऊनपूर्वी सन २०१९मध्ये १.४ दशलक्ष भारतीय पर्यटकांनी सिंगापूरला भेट दिली होती. नंतर या संख्येमध्ये मोठी घट झाली.

मात्र, आता पुन्हा भारतीयांचे सिंगापूरचे आकर्षण वाढले आहे. सन २०२३मध्ये भारतीय पर्यटकांची संख्या १.१ दशलक्षांवर पोहोचली आहे.

भारतीय पर्यटकांमध्ये वाढ व्हावी यासाठी सिंगापूरने मुंबई आणि दिल्लीमध्ये दोन कार्यालयेही सुरू केली आहेत.