जगभरातील 'या' सुंदर शहरांना एकदा तरी नक्की भेट द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 04:12 PM2019-01-07T16:12:52+5:302019-01-07T16:21:56+5:30

जगभरात नैसर्गिक सौंदर्याने नटलेली आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली अनेक ठिकाणं आहेत. पर्यटकांना ही ठिकाणं नेहमीचं खुणावत असतात. जगभरातील अशाच काही सुंदर शहरांना एकदा तरी नक्की भेट द्या.

मोरक्कोमधील Chefchaouen हे अत्यंत सुंदर शहर आहे. निळा रंग हा स्वर्गाचे प्रतिक म्हणून ओळखला जात असल्याने या शहरातील प्रत्येक घर हे निळ्या रंगानी रंगवण्यात आले आहे. Chefchaouen मधील वास्तूकला अप्रतिम आहे.

चीनमधील Yangshuo या शहरात निसर्गाचा सुंदर आविष्कार पाहायला मिळतो. उंच पर्वत रांगा, नद्या आणि विलोभनीय दृष्य मनाला भूरळ पाडतं. सहलीचा बेत आखत असाल तर या ठिकाणाचा नक्की विचार करा.

जपानमधील हिताची सीसाइडी पार्क हे प्रसिद्ध ठिकाण असून जगभरातील पर्यटक या ठिकाणाला आवर्जून भेट देत असतात. येथील रंगीबेरंगी फुलं लक्ष वेधून घेतात. तसेच या ठिकाणी फिरताना मन प्रसन्न होते.

इथोपिया येथील लालिबेलाहे एक पवित्र शहर मानलं जातं. इथोपिया हे शहर चर्चसाठी प्रसिद्ध असून येथील चर्चची रचना विशेष आहे.

स्पेनमधील बिलबाओ येथे गुगेनहम म्युझियम आहे. जहाज आणि फुलाच्या आकारात हे म्युझियम तयार करण्यात आले आहे. युर्नियमच्या मदतीने तयार करण्यात आलेले हे म्युझियम 1997 मध्ये सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले.

अमेरिकेतील क्यूबेक हे शहर अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहे. स्वच्छतेसोबतच या शहरात शांतिपूर्ण वातावरण आहे. या शहराला दरवर्षी अनेक पर्यटक भेट देत असतात.

बेल्जियममधील ब्रूश हे शहर अत्यंत प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक इमारतींसोबतच हे शहर चॉकलेट आणि बियरसाठी प्रसिद्ध आहे.