वाशिंद स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 02:20 PM2017-12-09T14:20:24+5:302017-12-09T14:21:56+5:30

लोकल वाहतूक उशिरानं सुरु असल्याने संतप्त प्रवाशांनी वाशिंद रेल्वे स्थानकात रेल रोको केला.

आधीच दाट धुक्यामुळे मध्य रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असताना, लोकल थांबवून एक्स्प्रेस सोडल्याने प्रवासी संतापले.

मिळालेल्या माहितीनुसार 5 वाजून 2 मिनिटांची लोकल जवळपास सहा वाजता रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. मात्र यानंतरही एक्स्प्रेसला मार्ग करुन दिला जात असल्याने प्रवासी संतापले आणि रेल रोको करण्यास सुरुवात केली.

प्रवाशांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर दरम्यान 8.30 च्या सुमारास वाशिंद रेल्वे स्थानकातून लोकल रवाना झाली.