WhatsApp Status मध्ये लवकरच येणार नवीन फीचर, करेल असं काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 11:35 AM2022-11-26T11:35:48+5:302022-11-26T11:41:22+5:30

WhatsApp : लोकांना व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटस फीचर आवडते, पण त्याला काही मर्यादा आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. यावर तुम्हाला अनेक आकर्षक फीचर्स मिळतात. अ‍ॅप्स डेव्हलपर्स युजर्सचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी या प्लॅटफॉर्मवर नव-नवीन फीचर्स जोडत राहतात.

आता असेच एक नवीन फीचर समोर आले आहे. लोकांना व्हॉट्सअ‍ॅपचे स्टेटस फीचर आवडते, पण त्याला काही मर्यादा आहेत. लवकरच तुम्ही त्यावर व्हॉइस नोट्स देखील शेअर करू शकणार आहात. म्हणजेच, तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये ऑडिओ अ‍ॅड करू शकणार आहात.

व्हॉट्सअ‍ॅप सध्या या फीचरवर काम करत आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेबल व्हर्जनमध्ये एखादे फीचर आणण्यापूर्वी, त्याची बीटा व्हर्जनमध्ये टेस्ट केली जाते. WABetaInfo द्वारे व्हॉट्सअ‍ॅपचे आगामी फीचर स्पॉट केले गेले आहे.

आतापर्यंत तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये ( WhatsApp Status) व्हिडिओ, फोटो किंवा टेक्स्ट मेसेज शेअर करता. मात्र, आता लवकरच तुम्हाला येथे ऑडिओ शेअर करण्याचा ऑप्शनही मिळेल. व्हॉट्सअ‍ॅपच्या iOS व्हर्जनवर हे फिचर दिसले आहे.

रिपोर्टनुसार, यूजर्स या प्लॅटफॉर्मवर 30 सेकंदांचा ऑडिओ शेअर करू शकतील. हा ऑप्शन तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप चॅटप्रमाणेच मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला माइकचा आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही ऑडिओ स्टेटस रेकॉर्ड करू शकता.

हे व्हॉइस स्टेटस फक्त त्या लोकांसाठी दिसेल, ज्यांच्याशी तुम्ही शेअर कराल. मात्र, यासाठी यूजर्सला प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन यूजर्स सिलेक्ट करावे लागतील. रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये शेअर केलेली व्हॉइस नोट एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असणार आहे.

हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या स्टेबल व्हर्जनवर कधी येईल, हे सध्या माहीत नाही. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपकडून लॉक स्क्रीन फीचरवरही काम करण्यात येत आहे. हे फीचर व्हॉट्सअ‍ॅप वेब व्हर्जनसाठी असणार आहे. या प्लॅटफॉर्मवर लवकरच इतर अनेक फीचर्स देखील जोडली जाऊ शकतात.

डेस्कटॉप अॅपसाठी वेगळ्या कॉलिंग टॅबचे फिचर्स देखील बीटा व्हर्जनमध्ये दिसून आले आहे. दुसरीकडे, स्टेबल व्हर्जनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या कम्युनिटी आणि व्हॉट्सअ‍ॅप पोल सारखे फीचर्स अलीकडे जोडण्यात आली आहेत. अ‍ॅपमध्ये अनेक नवीन प्रॉयव्हसी ऑप्शन देखील देण्यात आले आहेत.