या आहेत 30 हजार रुपयांच्या आत येणाऱ्या भारतातील बेस्ट Smart TVs; मिळेल 50 इंचाचा डिस्प्ले

By सिद्धेश जाधव | Published: April 5, 2022 06:36 PM2022-04-05T18:36:34+5:302022-04-05T18:41:07+5:30

सध्या बाजारात Smart TV जास्त उपलब्ध होत आहेत. त्यामुळे तुम्ही देखील एक चांगला टीव्ही शोधत असाल तर तुम्हाला देखील स्मार्ट टीव्ही विकत घेण्याचं मोह होऊ शकतो

तुमचं बजेट 25-30 हजार रुपयांच्या दरम्यान असेल तर या लेखात आम्ही तुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या बेस्ट स्मार्ट टीव्ही मॉडेल्सची माहिती घेऊन आलो आहोत.

यातील 43 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले 1920x1080 स्क्रीन रिजोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह बाजारात आला आहे. कंपनीनं 64-bit Quad Core प्रोसेसरसह 1GB RAM आणि 8GB स्टोरेज दिली आहे. तर 24W चे स्पिकर्स Dolby Audio सह सादर करण्यात आले आहेत. या स्मार्ट टीव्हीची किंमत 25,999 रुपये आहे.

यात 43-इंचाचा फुल एचडी डिस्प्ले 1920x1080 स्क्रीन रिजोल्यूशनसह मिळतो. प्रोसेसिंगसाठी 64-bit ऑक्टा कोर प्रोसेसरसह 1GB RAM आणि 8GB स्टोरेज देण्यात आली आहे. 20W स्पिकर्स Dolby Audio सिस्टमलस सपोर्ट करतात. या स्मार्ट टीव्हीची किंमत 27,999 रुपये आहे.

यात 43 इंचाचा 4K डिस्प्ले 3840x2160 स्क्रीन रिजोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. तसेच Quad Core प्रोसेसरसह 2GB RAM आणि 16GB स्टोरेज मिळते. कंपनीनं 24W स्टीरियो स्पिकर्स देखील दिले आहेत. या स्मार्ट टीव्हीची किंमत 28,999 रुपये आहे.

या यादीतील सर्वात मोठा 50 इंचाचा 4K एलईडी डिस्प्ले या टीव्हीमध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. प्रोसेसिंग पावरसाठी CA53 Quad core प्रोसेसरसह 1.75 GB RAM आणि 8GB स्टोरेज आहेच. या स्मार्ट टीव्हीची किंमत 29,990 रुपये आहे.

यात 43-इंचाचा 4K डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 3840x2160 स्क्रीन रिजोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात 64-bit ऑक्टा-कोर प्रोसेसर, 2GB RAM आणि 8GB स्टोरेज देण्यात आली आहे. शाओमी स्मार्ट टीव्हीमधील 20W स्टीरियो स्पिकर्स Dolby Audio ला सपोर्ट करतात. या स्मार्ट टीव्हीची किंमत 29,999 रुपये आहे.