1515 रुपयांच्या हप्त्यावर मिळवा iPhone 12 Mini; फ्लिपकार्टच्या सेलमध्ये डिस्काउंटसह विक्री

By सिद्धेश जाधव | Published: February 10, 2022 06:00 PM2022-02-10T18:00:48+5:302022-02-10T18:07:54+5:30

Apple iPhone 12 Mini डिस्काउंटसह फ्लिपकार्टच्या मोबाईल बोनांझा सेलमध्ये उपलब्ध झाला आहे. तसेच ईएमआय ऑफर्सचा वापर केल्यास फक्त 1515 रुपये देऊन हा फोन घरी आणता येईल.

आयफोन 12 मिनी मध्ये 5.4 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1080×2340 पिक्सल आहे. या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे.

हा फोन iOS 14 ऑपरेटिंग सिस्टमसह सादर करण्यात आला होता. प्रोसेसिंगसाठी यात A14 Bionic चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 64GB, 128GB आणि 256GB व्हेरिएंटमध्ये विकत घेता येईल.

फोटोग्राफीसाठी आयफोन 12 मिनी मध्ये 12 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. Flipkart वर iPhone 12 Mini दोन स्टोरेज ऑप्शन आणि 6 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहेत.

iPhone 12 Mini हा या सीरिजमधील आकाराने सर्वात छोटा आयफोन आहे. त्यामुळे ज्यांना कॉम्पॅक्ट स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही हा फोन विकत घेण्याचा पर्याय निवडू शकता.

लेटेस्ट iPhone 13 Mini देखील याच फॉर्म फॅक्टरसह येतो. परंतु किंमत कमी हवी असेल तर फ्लिपकार्ट सेलमध्ये डिस्काउंटसह उपलब्ध असलेल्या iPhone 12 Mini कडे वळता येईल.

iPhone 12 Mini सध्या 44,299 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून 15,500 रुपयांपर्यंतची बचत करू शकता.

सिटी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 750 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे. तर Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक दिला जात आहे. UPI पेमेंटवर देखील 200 रुपयांची सवलत मिळू शकते.

iPhone 12 Mini स्मार्टफोन ईएमआयवर विकत घेण्याचा पर्याय Flipkart देत आहे. 1515 रुपयांचा हप्ता देऊन हा फोन घरी आणता येईल. सोबत 499 रुपयांचे Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शन फ्री मिळत आहे.