भारतातील या रहस्यमयी घाटातून जाणारा केव्हाच परतत नाही, जगातील दुसरा 'बर्म्युडा ट्रँगल' म्हणून ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 12:53 PM2021-07-18T12:53:54+5:302021-07-18T12:59:02+5:30

जगात अनेक रहस्यमय घटना घडत असतात. पृथ्वीवर अशी अनेक रहस्यमय ठिकाणं देखील आहेत की जिथं घटणाऱ्या अनोख्या घटनांच मूळ कारण आजवर उलगडू शकलेलं नाही.

भारतात अरुणाचल प्रदेश येथील एक घाटमाथा देखील रहस्यमय घटनांसाठी ओळखला जातो. अरुणाचल प्रदेश आणि तिबेटमध्ये असणारा एक असा घाटमाथ्याचा परिसर आहे की ज्याचा आजवर कुणीच शोध घेऊ शकलेलं नाही.

अरुणाचल प्रदेशातील पर्वतरांगांमधील हा रहस्यमय परिसर शांग्रीला घाट (Shangri-La valley) नावानं ओळखला जातो. विशेष म्हणजे या भागात गेल्यावर वेळही थांबते असं सांगितलं जातं.

जगभरातील अनेकांनी शांग्रीला घाट परिसराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण आजवरचे सर्वांचं प्रयत्न अयशस्वीच ठरले आहेत. सुप्रसिद्ध लेखक अरुण कुमार शर्मा यांनी ‘तिब्बत की वह रहस्यमय घाटी’या त्यांच्या पुस्तकातही याचा उल्लेख केला आहे.

अरुण कुमार यांच्या मते जगात काही जागा अशा आहेत की ज्या ठिकाणी एखाद्या वस्तू किंवा व्यक्तीचं अस्तित्व जगातून गायब होऊन जातं. शांग्रीला घाटाला जगातील दुसरा बर्म्युडा ट्रँगल असं संबोधलं जातं.

'काल विज्ञान' या तिबेटीयन भाषेच्या पुस्तकात देखील या घाटाचा उल्लेख आढळतो. जेम्स हिल्टन नावाच्या लेखकानं देखील 'लॉस्ट हॉरीझन' या आपल्या पुस्तकात शांग्रीला घाटाबाबत लिहिलं आहे.

जेम्स हिल्टन यांच्या मतानुसार शांग्रीला घाट ही केवळ काल्पनिक जागा आहे. तर तिबेटीयन विद्वान युत्सुंग यांच्यानुसार या घाटाचा संबंध थेट अंतराळातील लोकांशी असल्याचं ते सांगतात.

अध्यात्म क्षेत्र, तंत्र साधना किंवा तंत्रज्ञानशी निगडीत लोकांसाठी हा घाट अभ्याससाठी अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. भारतासोबतच जगभरात या घाटाची ओळख आहे.

शांग्रीला घाटाबाबत आजवर अनेक रहस्यमय गोष्टी समोर आल्या असल्या तरी आजवर कुणालाच यामागचं रहस्य उलगडून सांगता आलेलं नाही.